• Download App
    Chaos in Sharad Pawar NCP, but Jayant Patil trying to set a different tune पवारांच्या राष्ट्रवादीत आमदार - खासदारांचा

    पवारांच्या राष्ट्रवादीत आमदार – खासदारांचा एकमेकांमध्ये नाही पायपोस; पण जयंत पाटील म्हणाले, मुंबईत भाजपला आणखी लोकांची गरज!!

    jayant patil

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : Jayant Patil शरद पवारांच्या राष्ट्रवादीत आमदार आणि खासदार यांच्यात एकमेकांमध्ये नाही पायपोस; पण जयंत पाटील म्हणाले मुंबईत भाजपला आणखी लोकांची गरज!!, असला प्रकार समोर आला.Chaos in Sharad Pawar NCP, but Jayant Patil trying to set a different tune

    पवारांच्या राष्ट्रवादीने महायुतीच्या सत्तेत जावे की नाही अजित पवारांच्या राष्ट्रवादीत विलीन व्हावे की नाही यावर त्यांच्याच खासदार आणि आमदारांची तोंडे परस्परविरोधी दिशेला आहेत. पवारांच्या आमदारांना सत्तेची वळचण खुणावते आहे, तर खासदारांचा भाजपच्या सत्तेबरोबर जायला विरोध आहे. त्यातच आता प्रदेशाध्यक्षपदी आपल्याला ७ वर्षे झाली. आता पदावरून मोकळे करा, अशी विनंती जयंत पाटलांनी करून स्वतःचा “वेगळा” आणि “मोकळा” मार्ग स्वीकारायचे संकेत दिले.



    एकीकडे पवारांच्या राष्ट्रवादीतले असे मोठे विसंगत राजकीय चित्र समोर आले असताना जयंत पाटलांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या भेटीवर एक भाष्य करून वेगळीच राजकीय फोडणी दिली. मुंबईत भाजपला आणखी काही लोकांची गरज असल्यामुळे देवेंद्र फडणवीस कदाचित राज ठाकरे यांना हॉटेलमध्ये जाऊन भेटले असावेत, असा टोला जयंत पाटील यांनी लगावला.

    पण स्वतःच्याच राष्ट्रवादीत खासदार आणि आमदार यांचा पायपोस एकमेकांमध्ये नाही. सत्तेत जायचं की कायमचं विरोधात बसायचं?? याचा निर्णय होत नाही, यावर जयंत पाटील यांनी कुठले भाष्य केले नाही. उलट बाकीच्या पक्षांमधले नेते राष्ट्रवादीत प्रवेश करत असल्याचा अजब दावा जयंत पाटलांनी केला. मुंबई लोक फुटपाथ वर देखील राष्ट्रवादीत प्रवेश करत आहेत‌. आमच्या गाड्या थांबून बुके देत आहेत, असे विचित्र वक्तव्य त्यांनी केले.

    Chaos in Sharad Pawar NCP, but Jayant Patil trying to set a different tune

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    काँग्रेसने उठविली टीकेची झोड, तरी अधिकाऱ्यांना लागली संघाची ओढ; पण भाजप सत्तेवर आल्यावर!!

    Salman Khan : सलमान खान नवीन घरात राहणार! 6 मजली इमारतीला MCZMA कडून मंजुरी, गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर 2024 मध्ये झाला होता गोळीबार

    Rohit Pawar : लातूरच्या व्हिडिओवरून रोहित पवारांचा सरकारवर हल्लाबोल; म्हणाले- पोलिसांचा वापर राजकारणासाठी नव्हे, गुन्हेगारांना वठणीवर आणण्यासाठी करा