जयंत पाटील – बावनकुळे भेटीची बातमी फुटल्यानंतर जयंत पाटलांची कबुली; पण “त्या” कारणासाठी नव्हे, “या” कारणासाठी भेट घेतल्याची मखलाशी!!
शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अस्वस्थ असलेल्या जयंत पाटलांनी काल मध्यरात्री भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे भेट घेतली. यासंबंधीची बातमी आज मराठी माध्यमांनी फोडली त्यानंतर जयंत वाटलांनी आपण “त्या” कारणासाठी नव्हे, तर “या” कारणासाठी बावनकुळे यांची भेट घेतल्याची कबुली दिली.