Donald Trump : शपथ घेतल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प ‘हे’ निर्णय आधी घेतील
डोनाल्ड ट्रम्प आज (सोमवार) अमेरिकेचे ४७ वे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेणार आहेत. शपथ घेतल्यानंतर लगेचच ट्रम्प यांची कृती अमेरिकेत दिसून येईल आणि ते अनेक कठोर निर्णय घेतील. मीडिया रिपोर्ट्सनुसार, शपथ घेतल्यानंतर ट्रम्प पहिल्याच दिवशी सुमारे १०० कार्यकारी आदेशांवर स्वाक्षरी करतील.