Donald Trump : भारत-पाकिस्तान युद्ध थांबवल्याचा डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा दावा
अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा मोठा दावा केला आहे. न्यूयॉर्क येथे झालेल्या संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत भाषण करताना त्यांनी भारत आणि पाकिस्तान यांच्यातील युद्ध थांबवण्यात आपली भूमिका असल्याचे सांगत स्वतःला “शांतिदूत” म्हणत शांततेचे नोबेल पारितोषिक आपल्याला मिळायला हवे होते असेही ट्रम्प म्हणाले.