Devendra Fadnavis दावोस मध्ये महाराष्ट्राची ऐतिहासिक भरारी; मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यात 15.70 लाख कोटींच्या बंपर गुंतवणुकीचे 54 करार!!
स्वित्झर्लंडमधील दावोस येथे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये इतिहास घडला असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वात महाराष्ट्राने आजच्या दुसर्या दिवशीपर्यंत 15.70 लाख कोटी गुंतवणुकीच्या एकूण 54 सामंजस्य करारावर स्वाक्षरी केल्या आहेत. यातून 15.95 लाख रोजगारनिर्मिती होईल.