पुण्यात आणि पिंपरी चिंचवड मध्ये भाजपची अजितदादांच्या राष्ट्रवादीशी नाही युती; देवेंद्र फडणवीसांची स्पष्टोक्ती
पुणे महापालिका आणि पिंपरी चिंचवड महापालिका या दोन महापालिकांमध्ये भाजप अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसशी युती करणार नाही. आम्ही दोन्ही पक्ष महायुतीत असलो, तरी आम्ही युती केली तर त्याचा फायदा दुसऱ्याला होईल. त्यामुळे आम्ही युती करून लढणार नाही. स्वतंत्रपणे लढू, अशी स्पष्टोक्ती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पुण्यात केली.