CM Fadnavis : बेशिस्त नियम खपवून घेतले जाणार नाहीत; अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या रील्सच्या लक्षवेधीवर CM फडणवीसांचे उत्तर
राज्यातील अनेक अधिकारी आणि कर्मचारी सोशल मीडियावर रील्स तयार करून आपण काम करत असल्याचे भासवतात. आता अशा बेशिस्त अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी सरकार नवीन जीआर काढणार आहे. बेशिस्त नियम खपवून घेतले जाणार नाहीत, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. आमदार परिणय फुके यांनी यासंदर्भात लक्षवेधी मांडली होती. त्यावर बोलताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी सदरील माहिती दिली.