Chhagan Bhujbal : भुजबळांचा सवाल- आम्ही लहान समाजात जन्मलो हे आमचे पाप आहे का? ओबीसींना आत्महत्या न करण्याचे आवाहन
राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री तथा बडे ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी शुक्रवारी मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून पुन्हा एकदा आपला संताप व्यक्त केला. आम्ही लहान समाजात जन्मलो हे आमचे पाप आहे का? आमच्या लेकराबाळांनी शिक्षण व नोकऱ्या करायच्या नाही का? असे उद्विग्न प्रश्न त्यांनी यासंबंधी उपस्थित केले. आरक्षणाच्या लढ्यात अगोदर आम्ही संपू, त्यानंतर तुम्हाला काय करायचे ते करा. पण आता कुणीही आत्महत्या करू नका, असेही ते यावेळी ओबीसी तरुणांना उद्देशून म्हणाले.