Chandrakant Patil : चंद्रकांत पाटील म्हणाले- दिवाळीनंतर दोन दिवसात आचारसंहिता लागू होईल, निवडणुकीच्या तयारीला लागू या
महाराष्ट्रात आता लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडणार आहेत. त्यानुसार सर्वच राजकीय पक्षांनी तयारी सुरू केली आहे. महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात आता चुरशीची लढत पाहायला मिळणार आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवर तंत्र व उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. दिवाळीनंतर दोन दिवसात आचारसंहिता जाहीर होईल, त्यामुळे आपण निवडणुकीच्या तयारीला लागू, असे त्यांनी म्हटले आहे.