Rahul Gandhi : राहुल गांधीची मतचोरीवरून निवडणूक आयोगावर टीका, भाजप नेत्यांचा पलटवार
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी एका पोस्टमध्ये म्हटले आहे की, “निवडणूक चौकीदार जागा राहिला, चोरी पाहत राहिला आणि चोरांना वाचवले.” त्यांनी ३७ सेकंदांची व्हिडिओ क्लिप शेअर केली आणि त्याला कॅप्शन दिले: “पहाटे ४ वाजता उठला, ३६ सेकंदात दोन मतदारांना हटवले, नंतर पुन्हा झोपला – अशा प्रकारे मतांची चोरी होते!”