Anna Hazare : आरोप झाल्यावर मंत्र्यांनी पदावर राहणे योग्य नाही, मुंडे, कोकाटेंच्या वादानंतर अण्णा हजारे यांची प्रतिक्रिया
अहिल्यानगर : ‘आरोप झाल्यावर मंत्र्यांनी एक क्षणही पदावर राहणे योग्य नाही. हा त्यांचा दोष आहे. मंत्र्यांचे आचरण, विचार शुद्ध असायला हवेत. जीवन निष्कलंक हवे. अपमान सहन करण्याची शक्ती असेल तरच जनता तुमचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून तसे अनुकरण करील,’ असे मत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी शुक्रवारी व्यक्त केले