कॉंग्रेसच्या कार्याध्यक्षा आणि महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी थेट शरद पवार यांना सुनावले आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राहूल गांधी यांच्याकडे देशाचे नेतृत्व करण्यासाठी सातत्य नाही, असे पवारांनी म्हटले होते. यावरून थेट सरकारच्या स्थिरतेबाबत ठाकूर यांनी इशारा दिला आहे. yashomati thakur statement to sharad pawar
विशेष प्रतिनिधी
मुंबई: कॉंग्रेसच्या कार्याध्यक्षा आणि महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी थेट शरद पवार यांना सुनावले आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राहूल गांधी यांच्याकडे देशाचे नेतृत्व करण्यासाठी सातत्य नाही, असे पवारांनी म्हटले होते. यावरून थेट सरकारच्या स्थिरतेबाबत ठाकूर यांनी इशारा दिला आहे.
yashomati thakur statement to sharad pawar
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी नुकतंच एका मुलाखतीत काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाबद्दल मत मांडले होते. कुठल्याही राजकीय पक्षाच्या नेतृत्वाला पक्षात आणि लोकांमध्ये किती मान्यता आहे हे फार महत्त्वाचं असतं. काँग्रेसजनांमध्ये गांधी-नेहरू घराण्याबद्दल आजही प्रचंड आस्था आहे. मात्र, राहुल गांधी यांच्या नेतृत्वात सातत्याची कमी दिसते, असे पवार म्हणाले होते.
याबाबत इशारा देताना ठाकूर म्हणाल्या आघाडीमधील काही नेत्यांच्या काही मुलाखती/लेख माझ्या निदर्शनास आलेत. काँग्रेसची कार्याध्यक्षा म्हणून आघाडीतील मित्रपक्षांना सांगू इच्छिते की हे सरकार स्थिर राहावं असं वाटत असेल कर काँग्रेसच्या शीर्ष नेतृत्वावर टीका-टीप्पणी करणं टाळावं.
पवार म्हणाले, “महाराष्ट्रातले चित्र बदलले” विधान परिषद निवडणुकीनंतर व्यक्त केली प्रतिक्रिया
आघाडी धमार्चं पालन सर्वांनी करावं. ठाकूर म्हणाल्या की, काँग्रेसचं नेतृत्व अतिशय स्थिर आहे, निर्णयक्षम आहे. राज्यातील महाविकास आघाडी हा त्याच निर्णयक्षमतेचा परिपाक आहे. राहुल गांधी यांच्याबाबत विधाने सहन केली जाणार नाहीत, असाच सूचक इशारा यातून ठाकूर यांनी पवारांना दिला आहे.