केंद्रीय गृह मंत्री अमित शहा यांच्या दौऱ्याला मिळालेल्या तुफानी प्रतिसादामुळे तृणमूल कॉंग्रेस आता हिंसाचारावर उतरली आहे. तृणमूल काँग्रेसविरोधात एकही मत दिलं गेलं तर रक्ताचे पाट वाहतील. भाजपला एकही मत दिलं तर त्याचे परिणाम भोगावे लागतील, अशा धमक्यांनी पश्चिम बंगालमधल्या भिंती रंगू लागल्या आहेत.
विशेष प्रतिनिधी
कोलकाता : केंद्रीय गृह मंत्री अमित शहा यांच्या दौऱ्याला मिळालेल्या तुफानी प्रतिसादामुळे तृणमूल कॉंग्रेस आता हिंसाचारावर उतरली आहे. तृणमूल काँग्रेसविरोधात एकही मत दिलं गेलं तर रक्ताचे पाट वाहतील. भाजपला एकही मत दिलं तर त्याचे परिणाम भोगावे लागतील, अशा धमका पश्चिम बंगालमध्ये खुलेआम दिल्या जाऊ लागल्या आहेत.
West Bengal election latest news
अमित शहा यांच्या दौऱ्यात तृणमूल कॉंग्रेसचे दिग्गज नेते सुवेंदू अधिकारी यांच्यासहीत बंगालच्या जवळपास ४२ नेत्यांनी भाजपला आपले मानले आहे. त्यामुळे भारतीय जनता पक्ष आणि तृणमूल कॉंग्रेस यांच्यात टोकाचा राजकीय संघर्ष सुरू झाला आहे. याच पार्श्वभूमीवर बंगालच्या नाडिया जिल्ह्यात एका भिंतीवर चक्क नागरिकांना धमकी देणारी सूचना लिहिण्यात आली होती.
तृणमूल काँग्रेसविरोधात एकही मत दिलं गेलं तर रक्ताचे पाट वाहतील. भाजपला एकही मत दिलं तर त्याचे परिणाम भोगावे लागतील, असं बंगाली भाषेत लिहिलेल्या या सूचनेत म्हटलं गेलंय. ही आक्षेपार्ह सूचना नेमकी कुणी लिहिली, याबद्दल प्रश्नचिन्हं कायम आहे. या भागात भाजपचे जगन्नाथ सरकार हे खासदार तर टीएमसीचे अरिंदम भट्टाचार्य हे आमदार आहेत.
West Bengal election latest news
नाडियातल्या या घटनेपूर्वी शनिवारी रात्री उत्तर २४ परगना जिल्ह्यातील बरेकपूरमध्ये काही जणांकडून भाजपच्या एका कार्यालयाला आग लावण्यात आली होती. त्यामुळे या भागातही तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. या भागातील टीएमसीचे आमदार शीलभद्र दत्त यांनी गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत भाजपामध्ये प्रवेश केला होता.