वृत्तसंस्था
बिरभूम : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दोन दिवसांच्या पश्चिम बंगाल दौऱ्यात तृणमूळ काँग्रेसच्या तोंडचे पाणी पळविल्यानंतर मुख्यमंत्री ममता बॅनर्जींना जाग आली आहे. आणि त्यांनी बिरभूमचा दौरा करून पाणीप्रश्न सोडविण्याचे तेथे जाऊन आश्वासन दिले आहे. West Bengal Chief Minister Mamata Banerjee visits Birbhum & interacts with locals while addressing their issues.
ममतांची सत्ता येऊन १० वर्षे उलटून गेली आहेत. आता त्यांना बिरभूमच्या आदिवासींची आठवण आली आहे. आदिवासींनी देखील त्या दिसताच क्षणी त्यांना पाणी प्रश्नाची आठवण करून दिली. त्यातही अमित शहांनी दोन दिवसांचा दौरा केला. रोड शो, रॅली यांचा धडाका उडवून दिला. तृणमूळचे नेते भाजपमध्ये घेतले.
त्याने तृणमूळच्या पायाची जमीन हादरली. आणि ममता बॅनर्जी यांनी बिरभूमचा दौरा केला. त्यात त्यांची स्टाइल दिसलीच. आदिवासींच्या घरात जायचे. तिथे लोकप्रतिनिधींना बोलवायचे. अधिकाऱ्यांना बोलवायचे. समस्या दिसली की त्यांना झापायचे आणि दुसऱ्या घरात शिरायचे. जणू काही आपण लोकप्रतिनिधींना आणि अधिकाऱ्यांना झापल्यानंतर काम झालेले दिसले पाहिजे.
West Bengal Chief Minister Mamata Banerjee visits Birbhum & interacts with locals while addressing their issues.
त्या प्रमाणे काही आदिवासींच्या घरांमध्ये ममता गेल्या. हातवारे करून लोकांशी बोलल्या. महिला, मुलांशी संवाद साधला. महिलांनी बिरभूमच्या पाण्याची समस्या ममतांपुढे मांडली. तिथल्या तिथे ही समस्या सोडविण्याचे आश्वासन देऊन त्या दुसरीकडे वळल्या. ममतांनी आधी मोठ्या रोड शोची घोषणा केली होती. पण त्यांनी आदिवासींच्या भेटी घेऊन दौरा आटोपता घेतलेला दिसला.
West Bengal: Chief Minister Mamata Banerjee visits Birbhum & interacts with locals while addressing their issues.
— ANI (@ANI) December 30, 2020
"We told her about the water problem in this area & other development issues. She said she'll resolve it," says a local woman, who spoke to CM. pic.twitter.com/Ls0EkBQiFY