विशेष प्रतिनिधी
१० डिसेंबर २०१५… नवी दिल्लीतील विज्ञान भवन… ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या अमृतमहोत्सवाचा सोहळा रंगला होता. राष्ट्रपती (कै) प्रणव मुखर्जी, पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यासह दिग्गज राजकारण्यांची मांदियाळी दाटीवाटीने प्रेक्षकांमध्ये बसली होती. राष्ट्रपती म्हणून मुखर्जींचे चौकटीतील होते, सोनियांनी अतिशय लाघवी, प्राजंळ भाषण केले होते; पण राजकीय टोलेबाजी मात्र पंतप्रधानांनीच केली होती. Watch Narendra Modis speech on Sharad Pawars 75th birthday
पियूष गोयल, राजनाथ सिंग यांना भेटल्यानंतर पवार मोंदींना पंतप्रधान कार्यालयात जाऊन भेटले; तर्कवितर्कांना उधाण मोदींचे आटोपशीर भाषण थोडेसे खेळकर आणि चिमटे काढणारेही होते. शेतकरयांना हवामानबदलाची उपजतच चांगली जाणीव असते, असे सांगून ते म्हणाले होते की, “पवार हे तर उत्तम शेतकरी. त्यांना बदलते हवामान तर कळतेच;
पण राजकीय हवा कोणत्या दिशेने वाहते आहे, हे ही पटकन समजते. तुम्ही त्यांच्याशी काही मिनिटे बोललात तरी देशातील बदलत्या राजकारणाची जाणीव तुम्हाला होईल.”