• Download App
    पंतप्रधानांच्या सुरक्षेत त्रुटी : लिबरल बुद्धिमंतांचा "सिलेक्टिव्ह पर्सनॅलिटी कल्ट" व्यक्तिपूजा वगैरे...!! । Error in the security of the Prime Minister: "Selective personality cult" of liberal intellectuals, etc.

    पंतप्रधानांच्या सुरक्षेत त्रुटी : लिबरल बुद्धिमंतांचा “सिलेक्टिव्ह पर्सनॅलिटी कल्ट” व्यक्तिपूजा वगैरे…!!

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षाव्यवस्थेत पंजाब दौऱ्यामध्ये मोठी त्रुटी आढळली. तिचे उल्लंघन झाले. या मुद्यावरून देशभर राजकीय गदारोळ सुरू असताना सुप्रीम कोर्टाने प्रकरणाची गंभीर दखल घेतली या प्रकरणामध्ये आंतरराष्ट्रीय स्वरूपाचे धोके लक्षात घेऊन यासंबंधी काही निरीक्षणे नोंदवली आणि अखेर राजकीय पक्षांच्या प्रतिक्रिया यांच्या पलिकडे जाऊन पंजाब – हरियाणा हायकोर्टाकडे पंतप्रधानांच्या ट्रॅव्हल डॉक्युमेंट्सची जबाबदारी सोपवली. या घटनेचे गांभीर्य राजकीय पक्षांना नाही पण ते सुप्रीम कोर्टाला निश्चितच अधिक आहे हे यातून दिसले. Error in the security of the Prime Minister: “Selective personality cult” of liberal intellectuals, etc.

    या पार्श्वभूमीवर देशातल्या लिबरल बुद्धिमंतांनी ज्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत त्या पाहता हे बुद्धिमंत किती “सिलेक्टिव्ह लिबरल” किंबहुना “कोत्या स्वातंत्र्यवादाचा” पुरस्कार करणारे आहेत हे लक्षात येते. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची काल भेट घेतली. या भेटीवरून रामचंद्र गुहा यांच्यासारख्या विचारवंतांना लगेच देशाच्या राजकारणात “व्यक्तिपूजेचेचा अतिरेक” आणि “एकाच व्यक्तीपुढे रांगणारे लोक” दिसू लागले…!!

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत दिसणारा हा “पर्सनॅलिटी कल्ट” राजीव गांधींच्या बाबतीत मात्र या लिबरल बुद्धिमंतांना दिसत नाही. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट जरूर घेतली पण ही भेट राष्ट्रपति भवनात झाली आणि महत्त्वाचे म्हणजे पंतप्रधान मोदी हे प्रोटोकॉल नुसार राष्ट्रपतींना भेटायला गेले होते. त्याउलट जेव्हा पंतप्रधान राजीव गांधी यांच्यावर श्रीलंकेत नौसैनिकाने गार्ड ऑफ ऑनरच्या वेळी बंदुकीच्या दस्त्याने जो हल्ला केला होता त्यातून ते बचावले. त्यानंतर श्रीलंका दौरा त्यांनी पूर्ण केला. ते जेव्हा नवी दिल्लीच्या विमानतळावर परत आले तेव्हा त्यावेळचे राष्ट्रपती आर. वेंकटरमण हे विमानतळावर त्यांच्या स्वागतासाठी उभे होते. राष्ट्रपती आर. वेंकटरमण यांनी त्यावेळी प्रोटोकॉल बाजूला सारून पंतप्रधानांचे विमानतळावर जाऊन स्वागत केले. हा त्यांच्या विशेष सौजन्याचा भाग होता. पण या भेटीला मात्र रामचंद्र गुहा यांच्यासारखे विचारवंत “पर्सनॅलिटी कल्ट” किंवा “व्यक्तिपूजेचा अतिरेक” किंवा “पंतप्रधान समोर रांगणारे उच्चपदस्थ” वगैरे म्हणत नाहीत. त्यांना फक्त राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी राष्ट्रपती भवनात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणे हाच “पर्सनॅलिटी कल्ट” आणि “व्यक्तिपूजेचा अतिरेक” दिसतो. हाच नेमका बुद्धीवंतांचा “सिलेक्टिव्ह लिबरलइझम” आहे…!!

    त्याच वेळी अनेक बुद्धिवंतांनी सुप्रीम कोर्टावर देखील आपल्या बौद्धिक वकुबानुसार ताशेरे मारले आहेत. सुप्रीम कोर्टाला 370 कलमाच्या प्रकरणाची सुनावणी घ्यायला वेळ नाही. मॉब लिंचिंग संदर्भातला हेबियस कॉर्पस सुप्रिम कोर्टात पडून आहे. त्याकडे पाहायला वेळ नाही. कोण एखाद्या सुरक्षा व्यवस्थेविषयी मात्र ताबडतोब दखल घ्यायला सुप्रीम कोर्टाला वेळ आहे, अशा आशयाची ट्विट अनेक बुद्धिमंतांनी यांनी आपल्या ट्विटर हँडलवर केली आहेत. “कोणा एखाद्याच्या” सुरक्षेविषयी ताबडतोब दखल हे शब्द हे बुद्धिमंत पंतप्रधानांच्या सुरक्षिततेविषयी वापरतात, यातच त्यांची बौद्धिक दिवाळखोरी दिसते. पण मतस्वातंत्र्याच्या नावाखाली ही बौद्धिक दिवाळखोरी भारतातच दडपता येते…!! हे दुर्दैव आहे.

    Error in the security of the Prime Minister: “Selective personality cult” of liberal intellectuals, etc.

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    पाकिस्तानी लष्करप्रमुखाच्या हिंदू हेट स्पीच नंतरच पहलगाम मध्ये दहशतवादी हल्ला; सर्जिकल आणि एअर स्ट्राइक पेक्षाही जबरदस्त तडाख्याची मोदी सरकारकडून अपेक्षा!!

    Jammu and Kashmir : जम्मू-काश्मीरमधील पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला, अनेक पर्यटक जखमी

    DGP murder case : निवृत्त डीजीपी हत्या प्रकरणात मोठा खुलासा ; पत्नी ५ दिवसांपासून गुगलवर हत्येचा प्लॅन शोधत होती