पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भाऊ मानणाऱ्या पाकिस्तानातील बलुची कार्यकर्त्या करीमा बलुच यांचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू झाला आहे. टोरांटो येथे त्यांचा मृतदेह सापडला. पाकिस्तानी अत्याचाराविरुध्द आवाज उठविणाऱ्या करीमा यांचा पाकिस्तानी इंटर इंटेलिजन्स सर्व्हिसेसकडून (आयएसआय) घातपात झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.
विशेष प्रतिनिधी
टोरांटो : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भाऊ मानणाऱ्या पाकिस्तानातील बलुची कार्यकर्त्या करीमा बलुच यांचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू झाल आहे. टोरांटो येथे त्यांचा मृतदेह सापडला. पाकिस्तानी अत्याचाराविरुध्द आवाज उठविणाऱ्या करीमा यांचा पाकिस्तानी इंटर इंटेलिजन्स सर्व्हिसेसकडून (आयएसआय) घातपात झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. Suspicious Death Of Karima Baloch In Canada
करीमा यांनी पाकिस्तानकडून बलुची जनतेवर होत असलेला अत्याचार जगासमोर आणला होता. संयुक्त राष्ट्रसंघातही त्यांनी आपली कैफियत मांडली होती. २०१६ मध्ये जगातील सर्वाधिक प्रभावी १०० महिलांमध्ये त्यांचा समावेश झाला होता.
बलुचीस्थान हा नैसर्गिक साधनसामुग्रीने अत्यंत संपन्न प्रांत आहे. मात्र, पाकिस्तानने त्याची लूट केली आहे. पाकिस्तानकडून सतत होणाऱ्या शोषणाविरुध्द बलुची जनतेमध्ये विद्रोहाची भावना आहे. त्याला आवाज देण्याचे काम करीमा यांनी केले होते. मात्र, त्यामुळे पाकिस्तानातून त्यांना निर्वासित व्हावे लागले होते. त्यांनी कॅनडामध्ये आश्रय घेतला होता. गेल्या तीन दिवसांपासून त्या बेपत्ता होत्या.
एका मुलाखतीत करीमा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भाऊ म्हणून हाक दिली होती. संपूर्ण बलुचीस्थानातील महिला त्यांच्याकडे आशेने पाहत आहेत. त्यामुळे बलुचीस्थानातील पाकिस्तानच्या अत्याचारांविरोधात आणि मानवाधिकाराचा होत असलेला भंग याबाबत आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर आवाज उठवावा असे आवाहन केले होते.
Suspicious Death Of Karima Baloch In Canada
रक्षाबंधनाच्या दिवशी त्यांनी ट्विटरवर नरेंद्र मोदी यांना राखी पाठवित पुन्हा आवाहन केले होते. बलुचीस्थानतील अनेक स्त्री-पुरुष बेपत्ता झाले आहेत. त्यांना नरेंद्र मोदी यांच्या रुपाने एका भावाच्या मदतीची अपेक्षा आहे, असेही त्यांनी म्हटले होते.