• Download App
    नवरात्री महोत्सवानिमित्त पुण्यातील प्रमुख मंदिरांना कडक पोलिस बंदोबस्तStrict police security at major temples in Pune on the occasion of Navratri festival

    नवरात्री महोत्सवानिमित्त पुण्यातील प्रमुख मंदिरांना कडक पोलिस बंदोबस्त

    पुण्यात शहर पोलीस, राज्य राखील पोलीस बल (एसआरपीएफ) यांच्यासह होमगार्ड यांना उत्सवाच्या ठिकाणी कडक बंदोबस्तासाठी तैनात केले आहे.Strict police security at major temples in Pune on the occasion of Navratri festival


    विशेष प्रतनिधी

    पुणे : आजपासून नवरात्रौत्सव सुरू झाले आहेत. यादरम्यान लोकडाऊन पासून बंद असलेली मंदिरे नागरिकांसाठी खुली करण्यात येणार आहेत .परंतु वाढता कोरोना लक्षात घेऊन उत्सवाच्या ठिकाणी चोख बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.

    पुण्यात शहर पोलीस, राज्य राखील पोलीस बल (एसआरपीएफ) यांच्यासह होमगार्ड यांना उत्सवाच्या ठिकाणी कडक बंदोबस्तासाठी तैनात केले आहे.मंदिराजवळ गर्दी टाळण्यासाठी स्थानिक पोलीस ठाण्यांना सूचना देण्यात आल्या आहेत.



    यावेळी माहिती पोलीस उपायुक्त भाग्यश्री नवटके म्हणाल्या की ,”सुरक्षेच्या दृष्टीकोनातून गर्दीच्या ठिकाणी साध्या वेशातील पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. तर, राज्य राखीव पोलीस दलाच्या चार तुकड्या तैनात ठेवण्यात आल्या आहेत”

    नवरात्रौत्सवनिमित्त शहरातील तांबडी जोगेश्वरी, चतुःश्रुंगी माता मंदिर, भवानीमाता मंदिर, सारसबाग येथील लक्ष्मी माता मंदिर, तळजाई माता मंदिर, संतोषी माता मंदिरासह प्रमुख मंदिरांमध्ये गर्दी होणार नाही, याची काळजी घेण्यात आली आहे.

    Strict police security at major temples in Pune on the occasion of Navratri festival

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    ऑपरेशन टायगरच्या दुधखुळ्या बातम्यांच्या गदारोळात भाजपच्या खऱ्या ऑपरेशनकडे माध्यमांचे दुर्लक्ष!!

    Baramati Bypoll 2026 : बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसची माघार; हर्षवर्धन सपकाळ यांची माहिती; तरीही निवडणूक बिनविरोध नाहीच, 23 उमेदवार रिंगणात

    CBSE Class : सहावीच्या वर्गात याच सत्रापासून 3 भाषा शिकवल्या जातील; सध्या पुस्तके उपलब्ध नाहीत; तरीही CBSE ने सांगितले- निर्देश 7 दिवसांत लागू करा