नाशिक : भांडण ठाकरे आणि शिंदेंचे; मुंबई आणि मराठवाड्यात गळती राष्ट्रवादी काँग्रेसला; भरती शिंदे सेनेत!!, असला प्रकार समोर आला. उद्धव ठाकरे यांनी बंडखोर खासदारांच्या विरोधात यवतमाळ आणि धाराशिव मतदारसंघांमध्ये जाऊन सभा घेतल्या. संजय जाधव आणि ओमराजे निंबाळकर यांची धुलाई केली. संजय राऊत यांनी दोन्ही खासदारांना शिव्यांची लाखोली वाहिली. पण हे दोन्ही नेते शिवसेनतली गळती रोखू शकले नाहीत.
पण त्यापलीकडे जाऊन उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या भांडणात राष्ट्रवादी काँग्रेसला मुंबई आणि मराठवाड्यात गळती लागल्याचे दिसून आले. मुंबई आणि मराठवाड्यातले राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते तो पक्ष सोडून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत दाखल झाले.
नांदेड जिल्ह्यातील विविध पक्षांचे पदाधिकारी तसेच सकल मातंग समाजाचे नेते आणि कार्यकर्त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हाती भगवा झेंडा घेत शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला. यावेळी त्यांचे पक्षात स्वागत करून भावी यशस्वी वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा दिल्या.
– राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये फूट
यावेळी सकल मातंग समाजाचे नेते तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे जनरल सेक्रेटरी मारुतीराव वाडेकर यांच्यासह, राष्ट्रवादी काँग्रेसचे सचिव ॲड. राम चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेसचे ईशान्य मुंबई अध्यक्ष सुरेश साळवे, सुदाम धुपे, राजेंद्र अडागळे, बाबुराव आंबेगावे, विष्णुराव गवळी, अरुण सूर्यवंशी, माजी सरपंच रामचंद्र पाटील, बालाजी पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई सचिव गुलाबराव अण्णाभाऊ साठे, अविनाश जेठे यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.
मारुतीराव वाडेकर यांच्यावर महाराष्ट्र समन्वयक म्हणून जबाबदारी सोपविण्यात आल्याचा उल्लेख करत तुम्ही समाजाला एकत्र करा, समाजाला न्याय देण्यासाठी सरकार तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे, असे सांगितले. तसेच सामाजिक न्यायमंत्री, मुख्य सचिव आणि संबंधित विभागाच्या सचिवांसोबत लवकरच बैठक घेऊन समाजाच्या सर्व प्रश्नांवर सकारात्मक निर्णय घेतले जातील अशी ग्वाही दिली. या प्रसंगी खासदार भाऊसाहेब वाघचौरे तसेच नांदेड शिवसेना पदाधिकारी आणि शिवसैनिक उपस्थित होते.
NCP faces exodus in Mumbai and Marathwada; Shinde Sena sees an influx of members!!
महत्वाच्या बातम्या
- Dada Bhuse : टीईटी पेपरफुटी प्रकरण; शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी तातडीने राजीनामा द्यावा, शिक्षक आमदार जयंत आसगावकर यांची मागणी
- TET पेपर फुटल्याच्या प्रकरणात पोलिसांची आधीच तातडीने कारवाई; नंतर शिक्षण मंत्र्यांच्या राजीनामाची मागणी!!
- राम मंदिराच्या चोरीतले ८ आरोपी गजाआड; चंपत राय आणि अनिल मिश्रांचे राजीनामे; त्यानंतर राम जन्मभूमी ट्रस्टच्या खुलासा!!
- वराती मागून घोडे हेच ठाकरेंचे नेहमीचे रडगाणे!!