भांडण ठाकरे आणि शिंदेंचे; मुंबई आणि मराठवाड्यात गळती राष्ट्रवादी काँग्रेसला; भरती शिंदे सेनेत!!
आधी पवारांच्या मागे धावले आणि आता फडणवीसांच्या मागे लागले!!, नेमका हाच राजकीय प्रकार मराठी पंतप्रधानाच्या बाबतीत घडला.
आधी पवारांच्या मागे धावले आणि आता फडणवीसांच्या मागे लागले!!, नेमका हाच राजकीय प्रकार मराठी पंतप्रधानाच्या बाबतीत घडला.
शिंदे सेनेच्या वाढीसाठी 39 नेत्यांवर पक्ष बांधणीची जबाबदारी; पण दोन्ही पवारांच्या पक्षांमध्ये एकमेकांवर खापर फोडणी!!, हेच राजकीय वास्तव महाराष्ट्रातून समोर आले.
प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीने दुहेरी खेळी केली मुंबईत त्यांनी काँग्रेस बरोबर युती केली पण उल्हासनगर मध्ये सत्तेसाठी वंचित बहुजन आघाडीच्या दोन नगरसेवकांनी शिंदे सेनेबरोबर आघाडी केली.
अंबरनाथच्या नगर परिषदेत एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला सत्तेपासून दूर करण्यासाठी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी फार मोठी खेळी केली खरी, पण ती सुद्धा तोकडी ठरली. अंबरनाथ नगर परिषदेत बहुमताची बाजी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेनेच मारली.
मुंबई महानगरपालिका निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला असतानाच वांद्रे (बांद्रा) परिसरातून एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे उमेदवार हाजी सालीन कुरेशी यांच्यावर प्रचारादरम्यान अज्ञाताने जीवघेणा हल्ला केला आहे. हल्लेखोराने कुरेशी यांच्या पोटात थेट चाकू भोसकल्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेना दक्षिण मुंबई, मलबार हिल विधानसभा प्रभारी तसेच महाराष्ट्र नवनिर्माण केबल सेना अध्यक्ष परेश तेलंग यांनी आज शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला. याप्रसंगी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांचे पक्षात स्वागत करून भावी यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
कल्याण-डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर डोंबिवली येथे शिवसेना विजय निर्धार मेळावा मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाला. यावेळी आगामी महापालिका निवडणुकीत शिवसेनेचा भगवा पुन्हा एकदा महापालिकेवर फडकवण्याचे आवाहन शिवसैनिकांना केले. पण युतीचे जागावाटप जाहीर होण्यापूर्वीच हा मेळावा घेतल्याने युतीबाबत संशय बळावला.
एकीकडे पुणे आणि पिंपरी चिंचवड मधून नेत्यांचा ओघ भाजपकडे सुरू असताना पुण्याचे माजी उपमहापौर आबा बागुल यांनी मात्र एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला.
विधानसभेत आज सत्ताधारी शिवसेना व विरोधी बाकावरील ठाकरे गटात पुन्हा एकदा वादाची ठिणगी पडली. ठाकरे गटाचे आमदार वरुण सरदेसाई यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा उल्लेख असा केला. त्यावर शिवसेनेचे मंत्री शंभूराज देसाई यांनी तीव्र आक्षेप केला. आम्हाला आयोगाने शिवसेना हे नाव दिले आहे. त्यामुळे आमचा उल्लेख शिवसेना असाच व्हावा, असे ते म्हणाले. यावेळी राष्ट्रवादीच्या अनिल पाटलांनीही आम्हाला राष्ट्रवादी काँग्रेस म्हणूनच ओळखले जावे, अशी मागणी केली. सत्ताधारी पक्षांना स्वतःच्या ओळखीसाठी असा संघर्ष करावा लागत असल्याने या प्रकाराची विधानभवन परिसरात खमंग चर्चा रंगली होती.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतले 7 मंत्री नाराज झाले आणि त्यांनी ती नाराजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर त्यांच्या दालनात जाऊन उघडपणे बोलून दाखविली.
महाराष्ट्रात महायुती सत्तेवर असली तरी पश्चिम महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका स्वबळावर लढवायची वेळ आली, तर कोणत्या प्रकारची रणनीती आखावी लागेल??, याची चाचपणी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि शिवसेनेच्या अन्य नेत्यांनी आज केली.
मुंबई एसटी बँकेतील बैठकीत झालेल्या राड्याप्रकरणी वकील गुणरत्न सदावर्ते यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. या प्रकरणी त्यांनी शिंदे गटाच्या संचालकांवर बैठकीला उपस्थित आदिवासी महिलांना कथितपणे बेअब्रू करण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप केला आहे. या प्रकरणी संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे. सदावर्ते यांच्या या भूमिकेमुळे या प्रकरणाची दाहकता वाढली आहे.
एसटी को-ऑपरेटिव बँक ही एसटी कर्मचाऱ्यांच्या घामाच्या पैशावर चालणारी आशिया खंडातील सगळ्यात मोठी को-ऑपरेटिव्ह बँक म्हणून ओळखली जात होती. परंतु सध्या ह्या बँके बाबत नेहमीच काही ना काही विचित्र ऐकायला येते. भ्रष्टाचाराच्या विळख्यात अडकलेले संचालक मंडळ कामगारांच्या मेहनतीच्या पैशांवर मौज करत आहे. याचे अनेक उदाहरणे आजवर आपण बघितलेत.
उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात शिंदे सेनेने अजित पवारांच्या राष्ट्रवादीला शह दिला असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दोन माजी आमदारांचा शिवसेनेत प्रवेश करून घेतला आहे.
प्रतिनिधी जळगाव/ मनमाड : शिवसेनेतील बंडाळीचे सत्र थांबण्याची चिन्हे दिसत नाहीत. शुक्रवारी जळगाव युवा सेनेचे जिल्हाप्रमुख शिवराज पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी युवा सेनेच्या पदांचा राजीनामा […]