• Download App
    कशी केली २ भावांनी मिळून भारतातील लोकप्रिय नीलोंस ब्रँडची स्थापना | Story of how two brothers launched India's popular Nilon's brand

    कशी केली २ भावांनी मिळून भारतातील लोकप्रिय नीलोंस ब्रँडची स्थापना

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई: नीलोंस कंपनीचे लोणचे हे खूप प्रसिद्ध आहे आणि याच लोणच्यासाठी ही कंपनी जगभरात ओळखली जाते. आज संपूर्ण भारतामध्ये अस्तित्व असलेल्या नीलोंस कंपनीचा प्रवास मात्र हा एका छोट्याश्या डायनिंग टेबल पासून सुरू झाला.

    Story of how two brothers launched India’s popular Nilon’s brand

    दिपक सांघवी यांचे वडील सुरेश सांघवी आणि त्यांचे भाऊ प्रफुल्ल यांनी घरातील किचनमधे १९६२ साली हा छोटासा व्यवसाय म्हणून सुरू केला. दिपक सांघवी यांनी या छोट्या व्यवसायाचे रुपांतर एका मोठ्या ब्रँडमध्ये केलेले आहे व ते आज या कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर आणि सीईओ आहेत.


    अमेरिकेतील भारतीय वंशाची पहिली मिस वर्ल्ड श्री सैनी हिची काळजाला भिडणारी कथा


    १९६२ मधे सुरेश सांघवी यांना शेतीमध्ये पदवी मिळाली परंतु त्यांचा मोठा भाऊ प्रफुल यांना वडिलांचे अकस्मात निधन झाल्याने शिक्षण पूर्ण करता आले नाही. शेती हेच दोघांचे एकमेव उत्पन्नाचे साधन होते.

    सांघवी कुटुंबाकडे १५०० एकरची मोठी लिंबाची बाग होती. त्यातून त्यांचे चांगल्या प्रकारे उत्पन्न होत होते. महाराष्ट्र एग्रीकल्चर अॅक्ट १९६१ या कायद्याअंतर्गत काही बंधने लादली गेली व त्यांना त्यांची ९० टक्के जमीन गमवावी लागली. उरलेल्या दहा टक्के जमिनीतून त्यांनी आपला शेती व्यवसाय चालू ठेवला. सुरेश आणि प्रफुल्ल या दोघा भावांनी घरातील डिनर टेबल त्यांची लॅबोरेटरी बनवली. यामध्ये त्यांनी विविध प्रकारची उत्पादने बनवण्यास सुरुवात केली. त्यांनी आंबा, पायनॅपल, मलबेरी अशा विविध फळांचे स्क्वॉश बनवायला सुरुवात केली. त्याचप्रमाणे त्यांनी जेली, केचप आणि इतर उत्पादने नीलोंस या नावाने विकायला सुरुवात केली.

    सूरुवातीच्या काळात त्यांच्या व्यवसायाला जास्त प्रतिसाद मिळाला नाही. पुढे चार वर्षं दीपक यांच्या वडिलांनी ५० उत्पादने तयार केली. १९६५ साली लॉसेसमुळे दोघा भावांचा व्यवसाय बंद करण्याचा विचार चालू होता. पण हा व्यवसाय सुरू ठेवण्यापलीकडे त्यांच्याकडे दुसरा पर्याय नव्हता.

    १९६६ साली त्यांनी घरगुती लोणचे बनवायला चालू केले. त्या वर्षामध्ये सरकारने मिलिटरी कॅन्टीन करिता विविध कंपन्यांना त्यांचे प्रॉडक्ट विकण्यासाठी टेंडर पाठवले होते. दोघा भावांनी या संधीचा फायदा घेतला आणि चार प्रकारच्या वरायटीचे लोणचे बनवले. यामध्ये चिली, मॅंगो, मिक्स आणि लिंबू यांचा समावेश होता. सुदैवाने स्पर्धात्मक रेट लावल्याने पुढील दोन वर्षासाठी कंपनीला सरकारकडून चार कॉन्ट्रॅक्ट मिळाले. लोणचं उत्पादनासाठी त्यांनी ७००० स्क्वेअर फूट जागा घेतली व १९६९ ते १९७० मधे कंपनीच्या टोटल सेल्समध्ये लोणच्याचा वाटा ९५ टक्के होता. त्यानंतर कंपनीने मागे वळून बघितले नाही.

    हाच वारसा पुढे दीपक यांनी अगदी उत्तमरित्या चालवला आणि आज ही कंपनी एक मोठा ब्रँड म्हणून ओळखले जाते. दीपक म्हणाले की, “याचा मला खूप आनंद आहे की मी हा वारसा पुढे चालवला आणि आमच्या कंपनीला मोठ्या उंचीवर नेण्याचे उद्दिष्ट पूर्ण केले.”

    Story of how two brothers launched India’s popular Nilon’s brand

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    उज्ज्वल निकमांना उमेदवारी; म्हणे, पूनम महाजनांचा पत्ता कट; पण हा तर खरा त्या पलीकडचा “मास्टर स्ट्रोक”!!

    कोल्हापूरची लढाई शाहू महाराज विरुद्ध संजय मंडलिक न ठेवता मोदी विरुद्ध राहुल गांधी करण्यात महायुती यशस्वी!!

    पुरोगामी महाराष्ट्राच्या नुसत्याच तोंडी वाफा; दुसऱ्या टप्प्यात मतदारांनी घरात काढल्या झोपा!!; वाचा मतदानाचा आकडा!!