• Download App
    “काँग्रेस कार्ड अक्टिव्हेट” झाले; सोनिया गांधींचा उध्दव ठाकरेंना फोन | The Focus India

    “काँग्रेस कार्ड अक्टिव्हेट” झाले; सोनिया गांधींचा उध्दव ठाकरेंना फोन

    • महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी एच. के. पाटील यांची पत्रकार परिषदेत माहिती
    • महाविकास आघाडीचा किमान समान कार्यक्रम राबविण्याच्या सूचना

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : महाराष्ट्रातल्या ठाकरे – पवार सरकार संदर्भात “काँग्रेसचे कार्ड अक्टिव्हेट” झाले आहे. सरकारबद्दल काँग्रेसची नाराजी उघडपणे बाहेर आली आहे. दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन काँग्रेसचे महाराष्ट्राचे प्रभारी एच. के. पाटील यांनी ठाकरे सरकारवर दबाव आणल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. sonia gandhi rings uddhav thackeray

    सरकारने ठरलेला किमान समान कार्यक्रम राबवावा अशा सूचना पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना फोनवरून केल्याची महत्त्वपूर्ण माहिती पाटील यांनी दिली आहे. राज्यात मागासवर्गीय समाजांसाठी असलेल्या योजना राबवाव्यात, त्यांना निधी देण्यात यावा असे पाटलांनी स्पष्ट केले आहे. sonia gandhi rings uddhav thackeray

    ज्येष्ठ नेते शरद पवार आणि मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यात वारंवार बैठका होत असतात. काँग्रेसला मात्र सरकारच्या निर्णय प्रक्रियेत सहभागी करून घेतले जात नसल्याने काँग्रेसमध्ये गेल्या काही दिवसांपासून खदखद आहे. काँग्रेसमध्ये अहमद पटेलांची जागा “वेगळ्या मार्गाने” काँग्रेस बाहेरचे ज्येष्ठ नेते घेण्याची चर्चा माध्यमांमध्ये घडवली जात असताना काँग्रेसचे कार्ड महाराष्ट्रात अक्टिव्हेट होण्याला वेगळे राजकीय महत्त्व आहे.

    _________________________________________

    सोनिया गांधी यांनी काढली कॉंग्रेस नेत्यांची लाज, उध्दव ठाकरेंना विचारले आमचे लोक सतावत तर नाहीत ना?

    _________________________________________

    राज्यात काँग्रेस मंत्र्यांना मिळत असलेल्या वागणूकीबद्दल बाळासाहेब थोरातांनी देखील आपली नाराजी उघड केली. कोरोनाच्या आपत्ती काळात अनेक मंत्री आपल्या जिल्ह्यात पालकमंत्री असल्याने थांबून काम करत होते. विदर्भातील काँग्रेसच्या मंत्र्यांच्या खात्यातील निर्णय हे त्यांना विश्वासात न घेता मुंबईत झाले. इतकेच नाही तर निर्णय होऊन फक्त फाईली मंत्र्यांच्या सहीसाठी गेल्या. त्यामुळे काँग्रेसचे मंत्री नाराज झाले. १४ तास प्रवास करून मुंबईत आले. आपल्या खात्यातील निर्णय परस्पर होत आहेत याची तक्रार मंत्री मुख्यमंत्र्यांना भेटून करणार होते पण तेव्हा मुख्यमंत्री भेटले नाही. हा विषय मग वाढत गेला.

    राहुल गांधी यांच्यासाठी महत्त्वाची असलेली न्याय योजना छत्तीसगडमध्ये काँग्रेस सरकारने लागू केली आहे. असंघटित क्षेत्रातील कामगारांना थेट आर्थिक मदत मिळावी म्हणून ही योजना आहे. ही न्याय योजना राज्यातही लागू करावी अशी मागणी कॅबिनेटमध्ये महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली. पण हा प्रस्ताव कॅबिनेटमध्ये प्रलंबित असून त्यावर कोणतीही चर्चा न झाल्याने काँग्रेसचे मंत्री अजून नाराज झाले आहेत.

    sonia gandhi rings uddhav thackeray

    वीज बिल सवलतीवरून महाविकास आघाडीत नाराजी असल्याचे समोर आले होते. काँग्रेसच्या खात्याच्या मंत्र्यांना अपेक्षित निधी मिळत नसल्याची भावना काँग्रेस मंत्र्यांमध्ये आहे. ऊर्जा खात्याने वीज बिलात सवलत मिळावी म्हणून आठ वेळा प्रस्ताव पाठवल्याची कबुली खुद्द ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी दिली होती. पण त्या प्रस्तावाबाबत अर्थखात्याकडून प्रतिसाद आला नसल्याचे त्यांनी सांगितले. आदिवासी विभागाला देखील अपेक्षित निधी मिळत नसल्याची तक्रार आहे. त्यामुळे आघाडीत काँग्रेसला सापत्न वागणूक मिळत असल्याची चर्चा आहे. याची दखल सोनिया गांधींनी घेऊन ठाकरे यांना फोन केलेला दिसतो.

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    ठोक भाषण, हाण भाजपची कॉपी; नाशिक मध्ये उबाठा शिवसेना मेळाव्याची “दमदार” कामगिरी!!

    National herald case : गांधी परिवाराचा बचाव करताना कपिल सिब्बल जे बोलले, त्यात एक “तथ्य” निश्चित, पण…