• Download App
    चाळीस इंचाचा बटाटा म्हणणारे, मिरचीचा रंगही माहित नसलेले राहुल गांधी शेतकऱ्यांना काय न्याय देणार, स्मृती इराणी यांची टीका | The Focus India

    चाळीस इंचाचा बटाटा म्हणणारे, मिरचीचा रंगही माहित नसलेले राहुल गांधी शेतकऱ्यांना काय न्याय देणार, स्मृती इराणी यांची टीका

    चाळीस इंचाचा बटाटा असतो, मिरचीचा रंग काय असतो हे देखील त्यांना माहित नाही असे राहूल गांधी शेतकºयांना न्याय काय देणार? अमेठीमध्ये पन्नास वर्षे राज्य करताना गांधी परिवाराने शेतकऱ्यांच्या जमीनी हडपल्या. आता हा परिवार शेतकऱ्यांच्या हिताच्या गोष्टी करत आहे, असा आरोप केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांंनी केली आहे.

    विशेष प्रतिनिधी

    मेरठ : चाळीस इंचाचा बटाटा असतो, मिरचीचा रंग काय असतो हे देखील त्यांना माहित नाही असे राहूल गांधी शेतकऱ्यांना न्याय काय देणार? अमेठीमध्ये पन्नास वर्षे राज्य करताना गांधी परिवाराने शेतकऱ्यांच्या जमीनी हडपल्या. आता हा परिवार शेतकऱ्यांच्या हिताच्या गोष्टी करत आहे, असा आरोप केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांंनी केली आहे. Smriti Irani criticizes Rahul Gandhi

    मेरठमध्ये आयोजित भारतीय जनता पक्षाच्या शेतकरी मेळाव्यात इराणी बोलत होत्या. इराणी म्हणाल्या, मिरची हिरवी असते की लाल हे देखील राहूल गांधी यांना संसदेत सांगता आले नाही हे संपूर्ण देशाने पाहिले आहे. त्यामुळे यांना शेतीची काय माहिती आहे, हे शेतकरी जाणतात. ते म्हणतात की ज्यांना शेतीच्या प्रश्नांची माहिती नाही त्यांनी कृषि कायद्याचा मसुदा तयार केला आहे. परंतु, मी त्यांना विचारते की राहूल गांधी शेतकरी आहेत का? सोनिया गांधी शेतकरी आहेत का?

    इराणी म्हणाल्या की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या सहा वर्षांच्या कार्यकाळात शेतकऱ्यांना किमान हमी भावाच्या माध्यमातून आठ लाख कोटी रुपये दिले. मात्र, संयुक्त पुरोगामी लोकशाही आघाडी सरकारने आपल्या दहा वर्षांच्या काळात केवळ साडेतीन लाख कोटी रुपये दिले होते. अमेठीचेच उदाहरण घेतले तर गांधी परिवाराच्या पन्नास वर्षाच्या कार्यकाळात येथील शेतकऱ्यांची काय दुरवस्था झाली हे सगळ्यांनी पाहिले आहे. मात्र, आज येथील शेतकरी प्रगतीच्या दिशेने वाटचाल करत आहे.

    Smriti Irani criticizes Rahul Gandhi

    मोदी सरकारने शेतकऱ्यांना पेन्शन योजना सुरू केली आहे.त्यांचे कर्ज माफ केले आहे. शेतकऱ्यांसाठी १ कोटी ३० लाख रुपयांचा निधी दिला आहे. भाजपा सरकारने नेहमीच शेतकऱ्यांच्या हितासाठी काम केले आहे.

    Related posts

    Slap on USA : व्यापाराची लालूच + काश्मीरप्रश्नी “मध्यस्थी” नकोय; महासत्ता अमेरिकेच्या अध्यक्षांची “ऑफर” भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्याने फेटाळली!!

    मोदींची आदमपूर हवाई तळाला भेट; बहादूर जवानांविषयी व्यक्त केली कृतज्ञता!!

    PM Modi च्या भाषणात no between the lines; पाकिस्तानच्या छातीवर केलाय वार, पाकिस्तान-दहशतवाद्यांना एकच न्याय आणि nuclear blackmail bye bye!!