केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी महाविकास आघाडीतल्या तीन पक्षांवर मात करून सिंधुदुर्ग जिल्हा बँकेची निवडणूक जिंकली. त्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी सिंधुदुर्ग जिल्हा बॅंक जिंकली आता पुढचे टार्गेट महाराष्ट्र सरकार, असे जाहीर केले. sindhudurg bank election
या मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या दोन पक्षांच्या नेत्यांनी नारायण राणे यांना शेलक्या शब्दांत घेरले आहे. गल्ली क्रिकेट स्पर्धा जिंकल्यामुळे कोणी वर्ल्डकप जिंकण्याचा आव आणला तरी त्याला वर्ल्डकप जिंकता येत नाही, अशा शब्दांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि मंत्री नवाब मलिक यांनी नारायण राणे यांना काल टोचून घेतले आहे.
शिवसेनेचे राज्यमंत्री आणि सातारा जिल्ह्यातील नेते शंभूराज देसाई यांनी नारायण राणे यांना आज टोचले आहे. नारळ – बत्ताशावरची कुस्ती जिंकून कोणी हिंदकेसरी पैलवानची बरोबरी करू शकत नाही, असे ते म्हणाले आहेत. महाराष्ट्रात सरकार आणण्याच्या बाता ते मारत आहेत पण सिंधुदुर्गचा शिवसैनिक त्यांना पुढच्या विधानसभा निवडणुकीत त्यांची जागा दाखवून देईल असे वक्तव्य शंभूराज देसाई यांनी केले आहे.
सातारा : राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयावर दगडफेक ; आ.शिंदे यांना अडचणीत आणल्याचा आंदोलकांचा आरोप
नवाब मलिक आणि शंभूराज देसाई यांची राजकीय वक्तव्ये 100% खरीच आहेत. खरोखरच एखाद्या जिल्हा बँकेची निवडणूक ही राज्याच्या किंवा देशाच्या निवडणुकीशी बरोबरी करू शकत नाही. ती स्थानिक पातळीवरची निवडणूक जिंकून कोणाला राज्यात किंवा देशात जिंकता येत नाही. यात कोणतीही शंका नाही…!!
पण एक “किरकोळ मुद्दा” फक्त हाच आहे, की नारायण राणे यांनी सिंधुदुर्ग जिल्हा बँकेची निवडणूक जिंकल्यानंतर ती जर नारळ – बत्ताशा वरची कुस्ती असेल किंवा गल्ली क्रिकेट मॅच जिंकली असेल, तर सातारा जिल्हा बँकेत लक्ष घालणाऱ्या “राष्ट्रीय” नेत्यांनी नेमका “कोणता तीर” मारला आहे…?? तो “गल्लीतला तीर” आहे…?? की “दिल्लीतला तीर” आहे…??
एरवी “राष्ट्रीय” नेते सातारा, पुणे, कोल्हापूर जिल्हा बँकांच्या निवडणुकीत, महापालिका – नगरपालिकांच्या निवडणुकीत, जिल्हा परिषदांच्या निवडणुकीत, साखर कारखान्यांच्या निवडणुकीत, साखर महासंघाच्या निवडणुकीत “लक्ष” घालतात त्यावेळी त्या सर्व निवडणुका एकदम “राष्ट्रीय” पातळीवर जाऊन पोहोचलेल्या असतात ना…!!
त्यामुळे अर्थातच त्या निवडणूका नारळ – बत्ताशा वरच्या कुस्त्या नसतात किंवा गल्लीतले क्रिकेट नसते. त्या निवडणुका हिंदकेसरीच्या लेव्हलच्या असतात आणि वर्ल्डकपच्या लेव्हलच्या असतात…!!
त्यामुळेच सातारा, पुणे, कोल्हापूर जिल्हा बँकांच्या निवडणुकीत लक्ष घालणारे “राष्ट्रीय” नेते हे कायम पंतप्रधानपदाचे उमेदवार असतात. सिंधुदुर्ग जिल्हा बँकेची निवडणूक ही मात्र नारळ – बत्ताशा वरची कुस्ती असते. ती जिंकणार्याने हिंदकेसरी होण्याचे स्वप्न बघायचे नसते. गल्लीतले क्रिकेट जिंकणाऱ्याने वर्ल्डकप पडण्याचे स्वप्न बघायचे नसते. पण सातारा, पुणे, कोल्हापुर मधल्या विविध निवडणुका जिंकून मात्र थेट देशाच्या पंतप्रधानपदापर्यंत उडी घेण्याचे “विशेष सर्टिफिकेट” प्राप्त होत असते…!!
sindhudurg bank election
महत्त्वाच्या बातम्या
- GUJRAT : भयावह : चर्चचा पाद्रीच निघाला विकृत नराधम-अल्पवयीन मुलीवर बलात्कार ; पत्नी करायची व्हीडिओ शूट
- कारभारी दमानं!! : महाराष्ट्रात मुख्यमंत्र्यांचे पर्यायी “कार्यभारी” आहेत तरी किती??
- पंढरपूर : आचार्य तुषार भोसले यांना काळं फासण्याचा प्रयत्न ; भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची
- आदित्यने माझा बराच ताण हलका केलाय!!; मुख्यमंत्र्यांचे सूचक राजकीय उद्गार!!