दिल्लीत विरोधी पक्षांची मोट बांधण्यासाठी घेतलेली बैठक फोल ठरल्यावर आता राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पलटी मारली आहे. दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनावर चर्चा करण्यासाठी निवडणूक रणनितीकार प्रशांत किशोर यांची भेट घेतल्याचे पवार यांनी सांगितले. Sharad Pawar turned around, said Prashant Kishor’s meeting to discuss the farmers’ movement
विशेष प्रतिनिधी
पुणे : दिल्लीत विरोधी पक्षांची मोट बांधण्यासाठी घेतलेली बैठक फोल ठरल्यावर आता राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पलटी मारली आहे. दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनावर चर्चा करण्यासाठी निवडणूक रणनितीकार प्रशांत किशोर यांची भेट घेतल्याचे पवार यांनी सांगितले.
शरद पवार यांनी आज पुण्यातील नूतन राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयाला भेट दिली. यावेळी पत्रकारांशी बोलताना पवार म्हणाले, प्रशांत किशोर यांच्या सोबतची बैठक प्रामुख्याने शेतकरी आंदोलनावर होती. दिल्लीत रस्त्यावर शेतकरी सहा महिन्यांहून अधिक काळ बसले आहेत.राजकीय पक्षाला वगळूनएका महत्वाचा प्रश्नांकडे समर्थन कसे देता येईल यावर बैठक होती. संसदेचे काम सुरू झाल्यावर तिथे हा विषय कसा मांडता येईल यावर चर्चा करण्यासाठी ही बैठक होती.
प्रशांत किशोर यांनी बुधवारी शरद पवार यांची भेट घेतली होती. शरद पवार आणि प्रशांत किशोर यांच्यात जवळपास १ तास बंद खोलीत बैठक चालली. त्यामुळे शरद पवार काहीतरी शिजवताहेत अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली होती.शरद पवार यांच्या दिल्लीतील निवासस्थानी ही बैठक झाली. आतापर्यंतची ही तिसरी भेट आहे. शरद पवारांच्या निवासस्थानी विरोधी पक्षातील नेत्यांची आणि काही मान्यवरांची मंगळवारी जवळपास अडीच बैठक झाली. या बैठकीनंतर पुन्हा प्रशांत किशोर हे शरद पवारांना भेटले.
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या प्रशांत किशोर यांनी यापूर्वी ११ जूनला शरद पवार यांची त्यांच्या मुंबईतील निवासस्थानी भेट घेतली होती. यानंतर प्रशांत किशोर यांनी सोमवारी शरद पवारांची दिल्लीत भेट घेऊन चर्चा केली होती.
शरद पवार यांच्या दिल्लीतील निवासस्थानी मंगळवारी ८ विरोधी पक्षांच्या नेत्यांची बैठक झाली होती. यात तृणमूल काँग्रेस, समाजवादी पार्टी, आम आदमी पार्टी, राष्ट्रीय लोकदल आणि डाव्या पक्षांचे नेतेही उपस्थित होते. या बैठकीत विविध मुद्द्यांवर चर्चा झाली. पण ही राजकीय बैठक नव्हती, असं राष्ट्र मंचाकडून सांगण्यात आलं.
Sharad Pawar turned around, said Prashant Kishor’s meeting to discuss the farmers’ movement
महत्त्वाच्या बातम्या
- Delhi Oxygen Audit : केजरीवाल, लाज असेल तर माफी मागा; देशभर तुटवडा असताना दिल्लीत ऑक्सिजनच्या चौपट मागणीवर गौतम गंभीर आक्रमक
- Delhi Oxygen Audit : दिल्लीच्या ऑक्सिजन रिपोर्टवर संबित पात्रा म्हणाले- केजरीवाल खोटं बोलल्याने 12 राज्यांवर परिणाम झाला
- ‘सीबीआय, ईडी काय तुमच्या पार्टीचे आहेत का?’, अनिल देशमुखांच्या निवासस्थानी ईडीच्या छाप्यानंतर संजय राऊतांची संतप्त प्रतिक्रिया
- 25 जून 1975 ते 21 मार्च 1977 : भारतीय लोकशाहीचा काळा अध्याय, 10 मुद्द्यांमधून समजून घ्या आणीबाणी