कर्मवीर भाऊराव पाटील यांनी बहुजन समाजातील विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी मिळावी यासाठी स्थापन केलेली रयत शिक्षण संस्था भ्रष्टाचाराचे आगार बनली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार या संस्थेचे अध्यक्ष आहेत. भ्रष्टाचार प्रकरणी संस्थेच्या दोन पदाधिकाऱ्यांचा राजीनामा घेतला आहे.
विशेष प्रतिनिधी
सातारा : कर्मवीर भाऊराव पाटील यांनी बहुजन समाजातील विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी मिळावी यासाठी स्थापन केलेली रयत शिक्षण संस्था भ्रष्टाचाराचे आगार बनली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार या संस्थेचे अध्यक्ष आहेत. भ्रष्टाचार प्रकरणी संस्थेच्या दोन पदाधिकाऱ्यांचा राजीनामा घेतला आहे. Sharad Pawar Rayat Shikshan Sanstha news
रयत शिक्षण संस्थेचे माजी सचिव भाऊसाहेब कराळे यांनी पुण्यात, तर माजी सचिव अरविंद बुरुगले यांनी साताऱ्यात रयत काऊन्सिलिंगच्या बैठकीत राजीनामा सोपवला. कर्मवीर भाऊरावांच्या कडक शिस्तीची अदृश्य काठी घोटाळेबाजांच्या माथी बसलीच पाहिजे, अशी आक्रमक भूमिका काही सदस्यांनी घेतली आहे.
रयत शिक्षण संस्थेच्या प्राध्यापक भरती प्रक्रियेबाबत लोकांच्या तक्रारी आल्या होत्या. त्यानंतर माजी सचिव भाऊसाहेब कराळे यांचा राजीनामा संस्थेने घेतला होता. सातारा येथे शरद पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत माजी सचिव अरविंद बुरुंगले यांचाही राजीनामा घेतल्यामुळे, रयत शिक्षण संस्थेत पुन्हा एकदा हा प्राध्यापक भरतीचा विषय चर्चेत आला आहे. या प्रकरणावर संस्थेतील कोणही बोलण्यास तयार नसल्याने, राजीनाम्याबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. या बैठकीला मात्र प्रसारमाध्यमांना पूर्णपणे मज्जाव केला होता.
Sharad Pawar Rayat Shikshan Sanstha news
पदाधिकाऱ्यांच्या राजीनाम्याचे मूळ हे प्राध्यापक भरती प्रकरणात आहे. पुण्याचं सावित्रीबाई फुले विद्यापीठ, कोल्हापूरचं शिवाजी विद्यापीठ आणि मुंबई विद्यापीठ या कार्यक्षेत्रात गेल्या वर्षी प्राध्यपक भरती झाली. मात्र याच भरती प्रक्रियेत आर्थिक व्यवहार झाल्याचा आरोप आहे. ज्या प्राध्यापकांनी संस्थेसाठी काम केलं, त्यांची सेवा ज्येष्ठता डावलून भलत्याच प्राध्यापकांची रयतमध्ये निवड केल्याचा आरोप आहे. माजी सचिव डॉ. बी. के. कराळे आणि माजी सचिव अरविंद बुरुंगले यांनी पदांचा गैरवापर केल्याचा आरोप आहेच. पण त्याशिवाय त्यांनी प्राध्यापक भरतीत आर्थिक व्यवहार केल्याचा आरोप आहे.