Enquiry For Pandemic Help by Delhi Police : कोरोना संकटाच्या काळात नेतेमंडळींनी औषधी आणि अत्यावश्यक वैद्यकीय उपकरणांचे वाटप केले. 10 एप्रिल रोजी गुजरातचे भाजप अध्यक्ष सी.आर. पाटील यांनी गरजूंना 5000 रेमडेसिव्हिर इंजेक्शन मोफत देण्याची घोषणा केली. पूर्व दिल्लीचे खासदार गौतम गंभीर यांनीही सोशल मीडियावर पोस्ट केले आणि फॅबी फ्लू आणि रेमडेसिव्हिर गरजूंना देण्याची घोषणा केली. युवा कॉंग्रेसचे नेते श्रीनिवास बी.व्ही. हे तर सातत्याने गरजूंना औषधे आणि वैद्यकीय उपकरणे पोहोचवत होते. मदत करणाऱ्यांची ही यादी मोठी आहे. यात दिग्गज राजकारण्यांचाही समावेश आहे. परंतु एका जनहित याचिकेमुळे आता त्यांची चौकशी सुरू झाली आहे. Sharad pawar Devendra Fadnavis Rahul Gandhi likely to Face Enquiry For Pandemic Help by Delhi Police After PIL In Delhi High Court
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : कोरोना संकटाच्या काळात नेतेमंडळींनी औषधी आणि अत्यावश्यक वैद्यकीय उपकरणांचे वाटप केले. 10 एप्रिल रोजी गुजरातचे भाजप अध्यक्ष सी.आर. पाटील यांनी गरजूंना 5000 रेमडेसिव्हिर इंजेक्शन मोफत देण्याची घोषणा केली. पूर्व दिल्लीचे खासदार गौतम गंभीर यांनीही सोशल मीडियावर पोस्ट केले आणि फॅबी फ्लू आणि रेमडेसिव्हिर गरजूंना देण्याची घोषणा केली. युवा कॉंग्रेसचे नेते श्रीनिवास बी.व्ही. हे तर सातत्याने गरजूंना औषधे आणि वैद्यकीय उपकरणे पोहोचवत होते. मदत करणाऱ्यांची ही यादी मोठी आहे. यात दिग्गज राजकारण्यांचाही समावेश आहे. परंतु एका जनहित याचिकेमुळे आता त्यांची चौकशी सुरू झाली आहे.
मोफत औषधी वाटणारे देवदूत की गुन्हेगार?
दै. भास्करने दिलेल्या वृत्तानुसार, कोरोना महामारीच्या काळात गरजूंना वैद्यकीय मदत देणारे युवा कॉंग्रेसचे अध्यक्ष श्रीनिवास बी. व्ही. यांची दिल्ली गुन्हे शाखेच्या पथकाने 14 एप्रिल रोजी सुमारे 40 मिनिटांसाठी चौकशी केली होती. श्रीनिवास बी. व्ही. म्हणाले, ‘पोलिसांनी त्यांना विचारले की, लोकांच्या मदतीसाठी औषधे आणि वैद्यकीय उपकरणे कोठून आणत आहात? जनतेपर्यंत औषधे आणि उपकरणे पोहोचविण्याचे युवा कॉंग्रेस हे माध्यम बनत आहे, असे त्यांनी उत्तर दिले. आम्ही साठेबाजी केली नाही.’ श्रीनिवास यांनी हे अधिक स्पष्ट केले, ते म्हणाले की, मी मदतीची पद्धत सविस्तरपणे पोलिसांसमोर ठेवली.
ते म्हणतात, उदाहरणार्थ, याचा विचार करा, ‘दिल्लीची आर्क फार्मास्युटिकल कंपनी आहे, त्यांचे 30 स्टोअर आहेत. आम्हाला माहिती आहे की, त्यांच्याकडे रेमडेसिव्हिर किंवा इतर औषधे आहे, मग आम्ही याची माहिती लोकांना देतो. त्यांचे आधार कार्ड, कोविड रिपोर्ट, डॉक्टरांची प्रिस्क्रिप्शन तिथे जमा केली जाते आणि लोकांना औषधे मिळतात.
त्याच प्रकारे, ऑक्सिजनचा सिलिंडर एक व्यक्ती वापरत नाही, तर बर्याच जणांसाठी वापरतो. आम्ही वापरलेला सिलिंडर आवश्यकता असलेल्या एका व्यक्तीकडे नेण्याचे काम करतो. श्रीनिवास म्हणतात, आम्ही लोकांचे एक माध्यम बनत आहोत, असे नाही की, आम्ही औषधांची साठेबाजी करून नंतर लोकांना मदत करत आहोत.
का होतेय मदत करणाऱ्यांची चौकशी?
29 एप्रिलला हार्ट फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. दीपक सिंह यांनी दिल्ली उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती. या याचिकेनुसार, कोरोना महामारीच्या काळात एकीकडे लोक रेमडिसिव्हिरसारख्या औषधांसाठी वणवण भटकत आहेत, तर दुसरीकडे नेतेमंडळी आणि राजकीय पक्ष साठेबाजी करून हीरो बनत आहेत. हे कसे होत आहे?
जनहित याचिका दाखल करणारे दीपक सिंह म्हणाले की, ‘नेते खुलेआम औषधे आणि उपकरणे वाटून घेत आहेत. याचा सहज अर्थ असा आहे की, या लोकांकडे मोठ्या प्रमाणात औषधे खरेदी करण्याची प्रणाली आहे. पण औषध आणि सौंदर्यप्रसाधन अधिनियम -1940 अंतर्गत इतक्या मोठ्या प्रमाणात औषधे खरेदी करण्यासाठी त्यांच्याकडे आवश्यक परवाना आहे का?’
ते म्हणाले की, सुरुवातीला हे सर्व दानशूर वाटतात, परंतु प्रश्न असा येतो की जेव्हा सामान्य माणूस औषधांसाठी भटकत असतो, तेव्हा हे लोक या कोठून विकत घेत आहेत आणि आपल्या खास लोकांकडे पाठवित आहेत?
मेडिकल माफिया-राजकारण्यांचे लागेबांधे?
डॉ. दीपक सिंह म्हणतात की, विनापरवाना औषधे खरेदी करता येत नाहीत, मग ती त्यांना कशी मिळाली? परवान्याविना अशा प्रमाणात औषधे ठेवणे साठेबाजीच आहे. दुसरे म्हणजे, प्रत्येकालाच ‘समानतेच्या हक्का’नुसार समान वैद्यकीय सुविधा मिळण्याचा अधिकार आहे. मग नेते आपल्या भागात औषधांचे वितरण कसे करतात? नेते त्यांची शक्ती वापरून मोठ्या प्रमाणात औषधे खरेदी करत आहेत आणि राजकीय फायद्यासाठी त्यांचे वितरण करत आहेत, हे स्पष्ट आहे.
सर्वोच्च न्यायालयाने आणि वेगवेगळ्या राज्यांच्या न्यायालयांनी साथीच्या काळात औषधे आणि वैद्यकीय उपकरणांच्या काळ्या बाजारावर कठोर भाष्य केले आहे. अशा परिस्थितीत या नेत्यांनी हे औषधे कुठून मिळवली हे स्पष्ट केले पाहिजे. देशात कार्यरत मेडिकल माफिया आणि राजकारणी यांच्यातील हे संबंध उघडकीस आणण्यासाठी सीबीआय चौकशीची मागणी याचिकाकर्त्याने केली आहे.
याचिकेत अनेक दिग्गज नेत्यांची नावे
या याचिकेत शिवसेनेचे माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी, गुजरातचे भाजप नेते सीआर पाटील, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप नेते सिरीश चदुरी, राष्ट्रवादीचे शरद पवार आणि रोहित पवार, कॉंग्रेसच्या प्रियंका वाड्रा गांधी आणि राहुल गांधी यांची नावे आहेत.
दिल्ली होयकोर्टाच्या परवानगीनंतर याचिकाकर्त्याची दिल्ली पोलिसांत तक्रार
4 मे रोजी दिल्ली उच्च न्यायालयाने या याचिकेच्या सुनावणीदरम्यान म्हटले की, “सध्या या प्रकरणात सीबीआय चौकशीची परवानगी दिली जाणार नाही. तथापि, न्यायालयाने याचिकाकर्त्यास दिल्ली पोलीस आयुक्तांकडे तक्रार करण्याची परवानगी दिली आहे. कोर्टाने दिल्ली पोलिसांना एका आठवड्यात स्टेटस रिपोर्ट सादर करण्याचे आदेश दिले. परवानगी घेतल्यानंतर याचिकाकर्त्याने आपली तक्रार दिल्ली पोलिसांकडे दिली. त्यानंतर दिल्ली पोलीस सर्व नेत्यांची चौकशी आणि तपास करत आहे.
Sharad pawar Devendra Fadnavis Rahul Gandhi likely to Face Enquiry For Pandemic Help by Delhi Police After PIL In Delhi High Court
महत्त्वाच्या बातम्या
- Wheat Procurement : एमएसपीवर थेट पेमेंटमुळे पंजाबात गव्हाच्या खरेदीचे सर्व रेकॉर्ड मोडले, 9 लाखांहून जास्त शेतकऱ्यांना फायदा
- पीएम मोदींची कोरोनावर हायलेव्हल मीटिंग, राज्यांना रुग्णसंख्या पारदर्शक ठेवण्याचे, व्हेंटिलेटरच्या योग्य वापराचे निर्देश
- औरंगाबाद घाटी रुग्णालयातील व्हेंटिलेटर्स बिघडल्याचे वृत्त चुकीचे, इन्स्टॉलेशनच चुकीचे केल्याने घडला प्रकार, वाचा सविस्तर…
- LOCKDOWN EFFECT : शाळा विकणे आहे ! औरंगाबादमधील ४० टक्के इंग्रजी शाळा पडणार बंद
- केंद्रावर टीका करा; पण जरा महाराष्ट्राच्या भीषण परिस्थितीबद्दलही जरा बोला ना… फडणवीसांचे सोनियांना खणखणीत पत्र