वृत्तसंस्था
नवी दिल्ली – मोदी कॅबिनेट – २ मध्ये फेरबदल होतोय. पण तो प्रत्यक्षात होण्यापूर्वीच मोदींचे सोशल इंजिनिअरिंग काँग्रेसला खटकायला लागले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अनेक दलित, पिछड्या नेत्यांना मंत्री बनवत आहेत, पण त्याने समाजहित साधले जाणार नाही असे टीकास्त्र काँग्रेसचे नेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी सोडले आहे. Several Dalits, backward caste members are being made ministers. They are doing it from the point of polls.
मोदींच्या नव्या मंत्रिमंडळात 12 मंत्री मागास प्रवर्गातील असतील. यातील प्रत्येक मंत्री वेगवेगळ्या एससी समुदायातील असेल. 12 मंत्र्यांपैकी दोन मंत्र्यांना कॅबिनेटमध्ये स्थान मिळण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर 8 मंत्री अनुसूचित जमातीचे असणार आहेत.
27 मंत्री ओबीसी समाजातील असतील. यापैकी 19 हे अतिमागास प्रवर्गातील जसे की यादव, कुर्मी, जाटव, शिंपी, कोळी आणि वोक्कलिगा या समुदायातील असतील. ओबीसी समुदायातील 5 मंत्र्यांना कॅबिनेटमध्ये स्थान मिळू शकते. 5 मंत्री वेगवेगळ्या अल्पसंख्याक समाजातील असतील. यामध्ये 1 मुस्लिम, 1 शीख, 2 बौद्ध आणि 1 ख्रिश्चन समाजातील असतील.
याशिवाय ब्राह्मण, भूमिहार, कायस्थ, क्षत्रिय, लिंगायत, पटेल, मराठा आणि रेड्डी समाजातील 29 मंत्री असतील.
मोदींचे नेमके हेच सोशल इंजिनिअरिंग मल्लिकार्जुन खर्गे यांना खटकले आहे. ते म्हणाले, की मोदी दलित आणि मागासवर्गीय नेत्यांना फक्त निवडणूक डोळ्यासमोर ठेवून मंत्री बनवत आहेत. हे त्यांच्यावरची राजकीय सक्ती आहे. असे दलित आणि पिछड्यांना नुसते मंत्री बनवून समाजाचे हित साधले जात नाही, असे टीकास्त्र देखील खर्गे यांनी सोडले.