नाशिक : शिवसेना संयुक्त पुरोगामी आघाडी अर्थात यूपीमध्ये जाणार का?, याच्या चर्चा फक्त प्रसार माध्यमातून आम्ही ऐकतो आणि वाचतो. हा विषय शिवसेना आणि काँग्रेसच्या चर्चेचा नाही आणि मूळात महाराष्ट्रात मिनी युपीएचा प्रयोग सुरू आहे, असे वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी नवी दिल्लीत केले आहे. ते आज काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांची भेट घेऊन त्यांच्याशी राजकीय चर्चा करणार आहेत. Saying that only Mini UPA is being experimented in Maharashtra, Sanjay Raut has slammed the Congress leaders … ??
या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी महाराष्ट्रात मिनी युपीएचाच प्रयोग चालू आहे, असे वक्तव्य केले आहे. पण या वक्तव्याच्या आशयाचे आशयाकडे बारकाईने पाहिले तर मिनी यूपीएचे नेतृत्व कोण करत आहे? आणि त्यामध्ये तिसऱ्या क्रमांकाचा पक्ष कोणता आहे?, यात खरी संजय राऊत यांच्या वक्तव्याची राजकीय मेख दडली आहे!!
केंद्रीय पातळीवर यूपीएचे नेतृत्व अर्थातच काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांच्याकडे आहे. किंबहुना त्या यूपीएच्या नेतृत्वावरून तर मोठा राजकीय वाद सुरु आहे आणि
तो वाद स्वतः संजय राऊत यांनी सामनातून यूपीएच्या अध्यक्षपदी शरद पवार यांना नेमा, असे सांगून सुरू केला आहे. तिथपासून ते पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी शरद पवार यांच्या उपस्थित यूपीएचे राजकीय अस्तित्व पुसून टाकण्यात पर्यंतचा युपीएचा “राजकीय प्रवास” झाला आहे!! आणि आता खुद्द ज्यांनी वाद सुरू केला आहे, तेच संजय राऊत महाराष्ट्रात मात्र मिनी यूपीएचा प्रयोग असल्याचे सांगत आहेत…!!, हे एक प्रकारे काँग्रेसच्या नेत्यांना डिवचण्यासारखेच आहे आणि तेही राहुल गांधींच्या भेटी पूर्वीचे वक्तव्य करून काँग्रेस नेत्यांना डिवचण्याचा हा प्रकार आहे…!!
महाराष्ट्रात काँग्रेस तिसर्या स्थानी आहे. शिवसेना पहिल्या स्थानी, राष्ट्रवादी दुसर्या स्थानी आहे. म्हणजे मिनी यूपीएचे नेतृत्व शिवसेनेकडे आहे, हेच राऊत यांना आपल्या वक्तव्यातून सूचित करायचे आहे.
Saying that only Mini UPA is being experimented in Maharashtra, Sanjay Raut has slammed the Congress leaders … ??
महत्त्वाच्या बातम्या
- पंजाबात क़ॉंग्रेसचा वचपा काढण्यासाठी कॅप्टन अमरिंदर सिंग पुन्हा नव्या जोमाने रिंगणात
- वयाच्या सत्तरीतही गुडघ्याला बांधले बाशिंग, जाहिरातीनंतर इच्छुक वधुंच्या प्रस्तावाचा पाऊस
- रशिया व युक्रेनच्या फौजा आमनेसामने, युद्धाच्या भितीने समस्त युरोपला ग्रासले
- महाराष्ट्रातील सहकारी बॅँकेवर रिझर्व्ह बॅँकेची कारवाई, १० हजारांपेक्षा जास्त रक्कम काढता येणार नाही