• Download App
    पवारांची वकीली करत संजय राऊतांच्या पुन्हा कॉँग्रेसला दुगाण्या | The Focus India

    पवारांची वकीली करत संजय राऊतांच्या पुन्हा कॉँग्रेसला दुगाण्या

    विशेष प्रतिनिधी 

    मुंबई : संयुक्त पुरोगामी लोकशाही आघाडीचे (यूपीए) नेतृत्व करण्यात आपल्याला रस नाही असे राष्टÑवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटले असले तरी संजय राऊत यांनी त्यांची वकीली सुरूच ठेवली आहे. हे करताना त्यांनी पुन्हा एकदा कॉँग्रेसवर दुगाण्या झाडल्या आहेत. Sanjay Raut again targetting Congress

    देशातील विरोधी पक्षात पोकळी निर्माण झाली आहे व विखुरलेला विरोधी पक्ष एका झेंडयाखाली एकत्र यावा, अशी अपेक्षा ठेवली तर काँग्रेसमधील मित्रांना ठसका का लागावा? असा सवाल संजय राऊत यांनी ‘सामना’च्य अग्रलेखात केला आहे. त्यांनी म्हटले आहे की, स्वातंत्र्यानंतर देश घडविण्यात काँग्रेसचे योगदान मोठे आहे. Sanjay Raut again targetting Congress

    काँग्रेसला दलित, मुसलमान, ओबीसींचा भक्कम पाठिंबा होता. काँग्रेस हा एक विचार होता व काँग्रेससाठी लोक लाठ्या खायला तयार होते. आज काँग्रेसची हक्काची मतपेटी पूवीर्सारखी राहिलेली नाही. राज्याराज्यांतील प्रादेशिक पक्षांनीही स्वत:चे एक स्थान निर्माण केले आहे. याचा अर्थ असा की, काँग्रेसचा परंपरागत मतदार इकडेतिकडे गेला आहे. यावर तोड काँग्रेसलाच काढावी लागेल. या विषयात इतरांनी पडू नये, असे काँग्रेस नेतृत्वास वाटते. काँग्रेस हा मोठा पक्ष आहे व आघाडीचे नेतृत्व मोठा पक्षच करतो, असेदेखील त्यांचे नेते म्हणतात. आमचेही त्याबाबत वेगळे मत नाही.

    पुरोगामी लोकशाही आघाडी म्हणजे यूपीए अधिक मजबूत होणे ही काळाची गरज आहे, पण ते व्हायचे कसे? विरोधकांच्या ऐक्यावर सध्या राष्ट्रीय मंथन सुरू झाले आहे. यूपीएचे नेतृत्व कोणी करावे, हा वादाचा मुद्दा नाही. यूपीए भक्कम करावी व भाजपसमोर आव्हान उभे करावे, हा मुद्दा आहे.

    Sanjay Raut again targetting Congress

    काँग्रेस पक्ष हे सर्व घडवून आणण्यास समर्थ असेल तर त्यांचे स्वागत आहे. कॉँग्रेससारख्या मोठ्या पक्षाने जमिनीवर चालू नये. मोठी झेप घ्यावी, अशी सगळ्यांच्या अपेक्षा आहे. काँग्रेस आजमितीस नक्कीच मोठा पक्ष आहे. पण मोठा म्हणजे नक्की काय आकारमानाचा? अशा शब्दांत कॉंग्रेसला हिणविले आहे.

    Related posts

    दहशतवाद्यांसाठी पाकिस्तान आता उरला नाही “सुरक्षित स्वर्ग”, हेच Operation sindoor चे सर्वांत मोठे यश!!

    Modi – J. D. Vance चर्चेत nuclear या शब्दाचा उल्लेखही नाही, पाकिस्तानने आगाऊपणा केला, तर भारताचा प्रतिकार जास्त विध्वंसक!!

    Operation sindoor मध्ये भारतीय सैन्य दलांनी 100 + दहशतवादी, पाकिस्तानचे 35 ते 40 अधिकारी आणि सैनिक मारले!!