- संजय राऊत यांनी शरद पवार यांना बसायला खुर्ची दिली तो व्हिडिओ आणि फोटो तुफान व्हायरल झाला .यावरून संजय राऊत ट्रोलही झाले .आता परत एकदा संजय राऊतांचा व्हिडिओ व्हायरल होत आहे…
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : राज्यसभेच्या १२ खासदारांचे निलंबन करण्यात आलं त्याच्या निषेधार्थ संसद परिसरात निलंबित 12 खासदारांचं आंदोलन सुरु आहे . त्या आंदोलनाला पांठिबा देण्यासाठी राहुल गांधींनीही उपस्थिती लावली.त्यावेळी संजय राऊत हे त्या ठिकाणी होते. राहुल गांधी आल्याचं बघताच आप आए, बहार आई असं संजय राऊत यांनी म्हटलं आणि परत एकदा राऊतांचा हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे…SANJAY RAUT: Aap Aaye Bahar Aaye …. Why Sanjay Raut’s Kissa Khurchi then a special song for Rahul Gandhi; Video viral …
काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधी यांनी आज निलंबित खासदारांच्या आंदोलनाला भेट दिली. यावेळेस संजय राऊतांनी केलेल विधान एकूण सर्वांनाच आश्चर्य वाटले.त्यांचा तो क्षण कॅमेरात कैद झाला आहे.
काय घडलं नेमकं?
राहुल गांधी हे जेव्हा बारा निलंबित खासदारांच्या आंदोलन स्थळी आले त्यावेळी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी त्यांचं स्वागत केलं.
तसंच ते खासदारांजवळ त्यांना घेऊन जात असतानाच आप आये बहार आयी हे शब्द उच्चारले. या संबंधीचा व्हीडिओ ट्विटरवर चांगलाच व्हायरल झाला आहे.
याच महिन्याच्या सुरूवातीला शिवसेना खासदार संजय राऊत यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भेट घेतली होती. तसंच प्रियंका गांधी आणि सोनिया गांधींनाही ते भेटले होते. त्यामुळे शिवसेना आणि काँग्रेस यांच्यात जवळीक वाढते आहे अशी चर्चा सुरू झाली.
महाराष्ट्रात शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी यांचं सरकार आहे. त्याच धर्तीवर देशात प्रयोग केला तर तो यशस्वी होऊ शकतो असंही संजय राऊत यांनी अनेकदा म्हटलं आहेत .
दरम्यान महाविकास आघाडी स्थापन केल्यानंतर राऊतांनी दिन ब दीन मोहोब्बत बढती जायेगी…असही ट्विट केलं होत …..