कतार एरलाईन्सच्या विमानाने राहुल गांधी रविवारी सकाळी इटलीला रवाना झाले आहेत. काँग्रेसचा स्थापना दिन सोमवारी (ता. 28) असताना एक दिवस अगोदरच इटलीला रवाना झाल्याने काँग्रेस नेते गोंधळले आहेत.
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : काँग्रेसचे नेते राहुल गांधी इटली दौ ऱ्यावर आहेत. मिलान येथे सुटीचा आनंद लुटण्यासाठी ते गेले आहेत. परंतु, त्यांनी दौऱ्यावर जाण्यापूर्वी कोरोनाचे नियम पायदळी तुडविल्याचा संशय नेटिझननी व्यक्त केला आहे. Rahul Gandhi trampled on Corona rule Netizen criticizes Italy tour
कतार एरलाईन्सच्या विमानाने राहुल गांधी रविवारी सकाळी इटलीला रवाना झाले आहेत. काँग्रेसचा स्थापना दिन सोमवारी (ता. 28) असताना एक दिवस अगोदरच इटलीला रवाना झाल्याने काँग्रेस नेते गोंधळले आहेत.
दरम्यान, अधिकृत सरकारी वेबसाइटनुसार कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भारत ई देशांच्या यादीमध्ये आहे. ख्रिसमस आणि नवीन वर्षाच्या नियमांनुसार ई देशातील लोक केवळ काम, आरोग्य किंवा अभ्यासाच्या कारणांसाठी, अत्यावश्यक कारणासाठी परदेश प्रवास करू शकतात. परंतु राहुल गांधी हे कोणत्या कारणाने इटलीला रवाना झाले, याचे कोडे आहे. त्याबाबत नेटिझननी शंका व्यक्त केली.
Rahul Gandhi trampled on Corona rule Netizen criticizes Italy tour
परंतु, नियमांनुसार, “इटलीतून परतणे / प्रवेश करण्यासाठी इटालियन / ईयू / शेंजेन नागरिकांना आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना तसेच दीर्घकालीन रहिवासी आलेल्याना आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना नेहमीच अनुमती आहे.”