विशेष प्रतिनिधी
पुणे:टोकियो गाजवणाऱ्या नीरज चोप्राचं महाराष्ट्र कनेक्शन आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.नीरज चोप्रा हा हरियाणातल्या रोड मराठा समाजाचा खेळाडू आहे. हरियाणातील पानिपत हे नीरज चोप्राचं गाव आहे.Pune ! Suvarnaveer Niraj Chopra also has a special connection with Pune … He took ‘this’ training in Pune…
निरज पुण्यातही वास्तव्यास होता .
टोकियो ऑलिम्पिकमध्ये भाला फेक मध्ये ऐतिहासिक कामगिरी करत सुर्वण पदकावर नाव कोरणाऱ्या नीरज चोप्रा ने पुण्यातील आर्मी स्पोर्टस इन्स्टिट्यूट येथे प्रशिक्षण घेतले आहे. दक्षिण मुख्यालय प्रमुख लेफ्टनंट जनरल जे एस नैन यांनी सुभेदार चोप्रा यांचे कौतुक केले.
सुभेदार चोप्रा यांनी 87.58 मीटर थ्रोसह ऑलिम्पिकमध्ये ट्रॅक अँड फील्ड गोल्ड जिंकणारा पहिला भारतीय खेळाडू बनून इतिहास रचला आहे. तसेच मूळचा हरियाणाच्या पानिपत जिल्ह्यातील खांद्रा गावातील शेतकरी कुटुंबातील असलेल्या.
त्यांना 26 ऑगस्ट 2016 रोजी भारतीय लष्करात नायब सुभेदार पदावर कनिष्ठ कमिशन अधिकारी म्हणून समाविष्ट करण्यात आले.  नीरज यांना त्यांच्या गुणवत्तेच्या सेवेसाठी 2018 मध्ये अर्जुन पुरस्कार आणि 2021 मध्ये विशिष्ठ सेवा पदकाने सन्मानित करण्यात आले. लेफ्टनंट जनरल नैन यांनी चोप्रा यांच्या ऐतिहासिक कामगिरीबद्दल भारतीय लष्कर आणि संपूर्ण राष्ट्राला त्यांचा अभिमान वाटत असल्याची भावना नैन यांनी व्यक्त केली आहे.