विशेष प्रतिनिधी
मुंबई – ‘नाइट फ्रँक’ने जागतिक पातळीवर घेतलेल्या सर्वेक्षणात ६१ टक्के भारतीयांनी एका वर्षात घरांच्या किमतीत वाढ होईल, असा अंदाज व्यक्त केला आहे. ६९ टक्के मुंबईकरांना येत्या वर्षात घरांच्या किमतीत वाढ होण्याची अपेक्षा आहे. २९ टक्के मुंबईकरांचे एका वर्षात ‘सेकंड होम’ घेण्याचे स्वप्न आहे. price of home will increase in Future in Mumbai
मालमत्ता क्षेत्रातील सल्लागार असलेल्या ‘नाइट फ्रँक’ने केलेल्या सर्वेक्षणात बहुतांश मुंबईकरांना घरांच्या किमतीत वाढ होण्याचा अंदाज आहे. मुंबई उच्चभ्रू वसाहतीमध्ये घरांच्या किमती अधिक असूनही त्या ठिकाणी घर घेण्याची इच्छा असलेले ८७ टक्के मुंबईकर आहेत.
३५ टक्के मुंबईकरांना तुलनेने अन्य शांत असलेल्या इतर शहरांमध्ये स्थलांतरित होण्याची इच्छा आहे. त्याचवेळी १३ टक्के मुंबईकरांचा मोठ्या शहरात स्थलांतर व्हावे, असा मानस आहे.
साधारण ५८ टक्के मुंबईकरांना त्यांच्या घरांच्या किमतीमध्ये एका वर्षात एक ते नऊ टक्के इतकी वाढ होण्याची अपेक्षा आहे. गेल्या वर्षी करोना संसर्ग सुरू झाल्यानंतर ६८ टक्के मुंबईकरांनी त्यांच्या घरांच्या किमतीत घट झाल्याचे नमूद केले होते.
price of home will increase in Future in Mumbai
महत्त्वाच्या बातम्या
- कोरोनामुळे मृत्यूवर भरपाईचे धोरण नसल्याने केंद्राला फटकारले, सर्वोच्च न्यायालयाने म्हटले- ‘तुम्ही काही करेपर्यंत तिसरी लाटही निघून जाईल’
- न्यूझीलंडमध्ये दहशतवादी हल्ला : इसिसच्या जिहादीने 6 जणांना चाकूने भोसकले, 3 जण गंभीर; पोलिसांच्या गोळीबारात हल्लेखोर ठार
- काबूलमध्ये ‘तालिबान सरकार’ स्थापनेचे होर्डिंग्ज, हक्कानी नेटवर्कलाही सत्तेत स्थान, मुल्ला बरादर करणार नेतृत्व
- National Asset Monetization Pipeline : सरकारी मालमत्तांतून निधी उभा