• Download App
    अत्याधुनिक जागतिक शहरे न्यूजर्सी, न्यूयॉर्क पाण्याखाली, मुसळधार पावसाने अमेरिका हादरली New York and newjersy collapsed due to rain and flood

    अत्याधुनिक जागतिक शहरे न्यूजर्सी, न्यूयॉर्क पाण्याखाली, मुसळधार पावसाने अमेरिका हादरली

    विशेष प्रतिनिधी

    न्यूयॉर्क – इडा चक्रीवादळामुळे अमेरिकेच्या न्यूयॉर्क शहर आणि न्यू जर्सी येथे मुसळधार पाऊस झाला असून निम्मे शहर पाण्य़ाखाली गेले आहे. त्यामुळे किमान ४५ हून अधिक जणांचे बळी गेले आहेत. न्यूयॉर्क शहरात विक्रमी पाऊस पडत असून महापूर आला आहे. रस्त्यावर ठिकठिकाणी पाणी साचल्याने नागरिक बिकट स्थितीचा सामना करत आहोत. New York and newjersy collapsed due to rain and flood

    न्यूयॉर्क शहर आणि प्रांताच्या अन्य भागात इडा चक्रीवादळामुळे आणीबाणी घोषित करण्यात आली. सब वे स्थानक आणि रुळावर पाणी साचल्याने मेट्रोपॉलिटन ट्रान्स्पोर्टेशन ॲथोरिटीने सर्व सेवा स्थगित केल्या. सोशल मीडियावर शहरात शिरलेल्या पाण्याचे व्हिडिओ व्हायरल होत आहेत.

    यात शहरातील प्रमुख मार्गावर उभ्या असलेल्या गाड्या खिडक्यापर्यंत बुडल्याचे दिसते. रस्त्याला तलावाचे रूप धारण केले आहे. मुसळधार पाऊस आणि पूर असताना न्यूजर्सीच्या ग्लूसेस्टर कौंटीत कौंटीला चक्रीवादळाचे संकट आहे.या भागातील शेकडो घरांची हानी झाली आहे. चोहोबाजूला पाणी साचले असून मेट्रो स्थानकातून झरे वाहत आहेत.

    New York and newjersy collapsed due to rain and flood

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Delhi Quad Meeting : दिल्ली क्वाड बैठकीत ऑस्ट्रेलियाने होर्मुजचा मुद्दा उपस्थित केला; म्हणाले- सागरी मार्गांचे स्वातंत्र्य आवश्यक, जयशंकर म्हणाले- दहशतवादावर शून्य सहनशीलता

    Hormuz : इराणने अमेरिकेचा MQ-9 रीपर ड्रोन पाडला; अमेरिकेचा होर्मुझजवळ इराणी बोटींवर हल्ला

    China Warns : चीनने म्हटले- भारताने दलाई लामांच्या उत्तराधिकारी प्रकरणापासून दूर राहावे; हा आमचा अंतर्गत प्रश्न, तिबेटच्या मुद्द्यात बाह्य हस्तक्षेप मान्य नाही