देशाचे भविष्य राहुल गांधी किंवा यूपीए नाही, तर वर्तमान आणि भविष्यही पंतप्रधान नरेंद्र मोदीच आहेत, असे प्रतिपादन देवेंद्र फडणवीस यांनी केले.
विशेष प्रतिनिधी
नाशिक : देशाचे भविष्य राहुल गांधी किंवा यूपीए नाही, तर वर्तमान आणि भविष्यही पंतप्रधान नरेंद्र मोदीच आहेत, असे प्रतिपादन देवेंद्र फडणवीस यांनी केले.
present and future of the country is Narendra Modi, not Rahul Gandhi says Devendra Fadnavis
नाशिकचे माजी आमदार बाळासाहेब सानप यांनी शिवसेनेला धक्का देत भाजपमध्ये घरवापसी केली आहे. यावेळी बोलताना फडणवीस म्हणाले की, भाजपचे आमदार आमच्याकडे येणार, अशा वावड्या महाविकास आघाडीचे नेते उठवत राहतात. पण, कुणीही पक्षात जाणार नाही. विरोधकांच्या आमदारांमध्ये प्रचंड नाराजी आहे. त्यामुळे ते पुंग्या सोडतात आणि त्यांच्या पुंग्या त्यांचीच लोक वाजवतात.
विविध पक्षातून आलेले राजकीय नेते प्रगल्भ आहेत. या देशाचे भविष्य राहुल गांधी किंवा यूपीए नाही, तर वर्तमान आणि भविष्यही पंतप्रधान नरेंद्र मोदीच आहेत, याची त्यांना जाणीव आहे. एकत्र लढण्याचा तिन्ही पक्षांना तात्कालिक फायदा होईल, पण त्यांच्या राजकीय स्पेसमध्ये किती जण मावतील, यात शंकाच आहे आणि ती स्पेस भाजपसाठी मोकळी असून आम्ही व्यापल्याशिवाय राहणार नाही, असेही फडणवीस म्हणाले.
फडणवीस म्हणाले की, एखादे सरकार धोक्याने आले असेल तर ते जास्त काळ टिकत नाही, हे सर्वांना माहिती आहे. आगामी काळात तिन्ही पक्षांनी एकत्र येऊन लढले पाहिजे. त्यामुळे जी राजकीय जागा निर्माण होईल, त्याचा फायदा आपल्यालाच होणार आहे. एखाद्या निवडणुकीत त्यांना फायदा झाला असेल पण आगामी निवडणुकीत भाजप सर्वात मोठा पक्ष ठरेल, असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.
present and future of the country is Narendra Modi, not Rahul Gandhi says Devendra Fadnavis
यावेळी बोलताना बाळासाहेब सानप म्हणाले की, ‘भाजपमध्ये काम करताना अनेकजण जोडले गेले. पक्ष मोठा करण्यासाठी खूप काम केले. मधल्या काळात थोडासा दुरावा आला, पण संघ आणि भाजपचे काम केलेला माणूस दुसरीकडे रमू शकत नाही म्हणून पुन्हा भाजपात प्रवेश करत आहे.