• Download App
    प्रताप सरनाईकांकडे आढळले पाकिस्तानी नागरिकाच्या नावाचे क्रेडिट कार्ड | The Focus India

    प्रताप सरनाईकांकडे आढळले पाकिस्तानी नागरिकाच्या नावाचे क्रेडिट कार्ड

    • पैशाच्या अफरातफरी प्रकरणाच्या ईडीच्या तपासाला वेग

    वृत्तसंस्था

    मुंबई : मनी लॉड्रिंग अर्थात पैशाची अफरातफर प्रकरणाच्या तपासात शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्याकडे एका पाकिस्तानी नागरिकाच्या नावाचे क्रेडिट कार्ड आढळल्याची माहिती समोर आली आहे. अंमलबजावणी संचलनालय अर्थात ईडी या प्रकरणाचा तपास करत आहे. ईडीने त्या क्रेडिट कार्डाच्या आधारे त्या पाकिस्तानी नागरिकाचा शोध सुरू केला असून त्याचे बँक डिटेल्सही मागविले आहेत. pratap sarnaik from credit card

    सरनाईक यांच्या घरांवर आणि १० ठिकाणांवर काही दिवसांपूर्वीच ईडीने छापे घातले होते. त्यावेळी प्रताप सरनाईक तेथे कोठेही नव्हते. त्यांचे पुत्र विहंग आणि त्यांचे एक सहकारी यांना ताब्यात घेऊन ईडीने चौकशी केली होती. विहंगच्या नावाने सरनाईकांचा रिअल इस्टेटचा व्यवसाय आहे. ते ओवळा – माजीवाडा मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार आहेत.



    ईडी मला घाबरवू शकत नाही. मी बोलत राहणारच अशी मुलाखत एबीपी माझाला देऊन प्रताप सरनाईक हे क्वारंटाइन झाले होते. ते त्यावेळी ईडीच्या चौकशीला सामोरे गेले नाहीत. त्यांना ईडीने चौकशीसाठी ३ नोटिसा बजावल्या.

    pratap sarnaik from credit card

    त्यानंतर १४ दिवसांनी प्रताप सरनाईक काल ईडीच्या चौकशी अधिकाऱ्यांसमोर चौकशीसाठी हजर राहिले. आज त्यांच्याजवळून पाकिस्तानी नागरिकाच्या नावे असलेले क्रेडिट कार्ड ईडीच्या अधिकाऱ्यांनी हस्तगत केले.

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    ठोक भाषण, हाण भाजपची कॉपी; नाशिक मध्ये उबाठा शिवसेना मेळाव्याची “दमदार” कामगिरी!!

    National herald case : गांधी परिवाराचा बचाव करताना कपिल सिब्बल जे बोलले, त्यात एक “तथ्य” निश्चित, पण…