कॉंग्रेसच्याच मुख्यमंत्र्यासह संपूर्ण मंत्रीमंडळाचा विरोध असताना तत्कालिन संयुक्त पुरोगामी लोकशाही आघाडीच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी आंध्र प्रदेशाच्या विभाजनाचा निर्णय घेतल्याबद्दल अनेकांनी शंका व्यक्त केली होती. याबाबत आता माजी सीबीआय संचालकांनी धक्कादायक खुलासा केला आहे. आंध्र प्रदेशाचे ख्रिश्चनीकरण करण्यासाठी चर्चच्या पाठपुराव्यामुळेच आंध्र प्रदेशचे विभाजन झाल्याचे एम. नागेश्वर राव यांनी म्हटले आहे. Partition of Andhra from Sonia Gandhi claims former CBI chief
वृत्तसंस्था
हैदराबाद : कॉंग्रेसच्याच मुख्यमंत्र्यासह संपूर्ण मंत्रीमंडळाचा विरोध असताना तत्कालिन संयुक्त पुरोगामी लोकशाही आघाडीच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी आंध्र प्रदेशाच्या विभाजनाचा निर्णय घेतल्याबद्दल अनेकांनी शंका व्यक्त केली होती. Partition of Andhra from Sonia Gandhi claims former CBI chief
याबाबत आता माजी सीबीआय संचालकांनी धक्कादायक खुलासा केला आहे. आंध्र प्रदेशाचे ख्रिश्चनीकरण करण्यासाठी चर्चच्या पाठपुराव्यामुळेच आंध्र प्रदेशचे विभाजन झाल्याचे एम. नागेश्वर राव यांनी म्हटले आहे.
एम. नागेश्वर राव यांनी याबाबत केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की , सोनिया गांधी यांनी ज्या पध्दतीने आणि अत्यंत घाईत आंध्र प्रदेशच्या विभाजनाचा निर्णय घेतला तो संशयास्पदच होता. यामागे षडयंत्र होते. Partition of Andhra from Sonia Gandhi claims former CBI chief
आंध्र प्रदेशाचे ख्रिश्चनीकरण करण्याचा डाव नोव्हेंबर १९९९ मध्येच पोप जॉन पॉल द्वितीय भारतात आले तेव्हा झाला होता. यासाठी चर्चने महत्वाची भूमिका बजावली. त्यामुळेच संपुआ सरकारच्या अखेरच्या कार्यकाळात आंध्रच्या विभाजनाचा निर्णय घाई गडबडीत घेण्यात आला.
२०१४ मध्ये आंध्र प्रदेशचे विभाजन करून तेलंगणा आणि सीमांध्र अशी दोन राज्ये बनविण्यात आली. मात्र, त्यावेळी आंध्र प्रदेश कॉंग्रेसच्या नेत्यांनीच या निर्णयाला विरोध केला होता. यासाठी कॉंग्रेसचे तत्कालिन मुख्यमंत्र्यांनी सोनिया गांधी यांना निवेदन दिले होते.
Partition of Andhra from Sonia Gandhi claims former CBI chief
आंध्र प्रदेश एकसंध ठेवण्याची मागणी त्यामध्ये करण्यात आली होती. या निवेदनावर रायलसीमा तसेच आंध्र किनारपट्टी भागातील कॉंग्रेस नेत्यांच्या सह्या होत्या. कॉंग्रेसच्या अनेक मंत्री आणि नेत्यांनी हा निर्णय घेतला तर पक्षत्यागाचा इशाराही दिला होता. मात्र, तरीही सोनिया गांधी यांनी आपला निर्णय बदलला नाही. एम. नागेश्वर राव यांनी यामागील कारणे सांगितली आहेत.
Manner/hurry in which Sonia Gandhi divided United AP in 2014 & rapid Christianisation of AP with State patronage amply demonstrates that Church was behind division of AP as part of Christianisation project unveiled by Pope John Paul-II in India in Nov1999.https://t.co/CfOAylHPjM
— M. Nageswara Rao IPS (@MNageswarRaoIPS) December 23, 2020