Andhra Pradesh : आंध्र प्रदेशमध्ये कोरोनाचे 12 रुग्ण, 4 मृत्यू; जीनोम सिक्वेन्सिंगसाठी पुण्याला पाठवले नमुने, शेजारील राज्य कर्नाटक सतर्कतेवर
आंध्र प्रदेशमध्ये २६ जून ते १६ जुलै दरम्यान कोरोना संसर्गाची १२ प्रकरणे समोर आली आहेत. या काळात ४ रुग्णांचा मृत्यूही झाला आहे. राज्य सरकारने विषाणूच्या प्रकाराचा (व्हेरियंट) शोध घेण्यासाठी ५ नमुने नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी (NIV), पुणे येथे पाठवले आहेत. तिकडे शेजारील राज्य कर्नाटकातही खबरदारी वाढवण्यात आली आहे.