• Download App
    अफगाणमध्ये कोणालाही ढवळाढवळ करू देणार नाही, तालिबानने पाकिस्तानला ठणकावले No one will be allowed to interfere in Afghanistan, the Taliban slammed Pakistan

    अफगाणमध्ये कोणालाही ढवळाढवळ करू देणार नाही, तालिबानने पाकिस्तानला ठणकावले

    विशेष प्रतिनिधी

    इस्लामाबाद : पाकिस्तानसह कोणत्याही देशाला अफगाणिस्तानच्या अंतर्गत प्रकरणात ढवळाढवळ करू दिली जाणार नाही, असे सांगत तालिबानने पाकिस्तानला ठणकावले आहे. पाकिस्तानच्या गुप्तचर संस्थेचे (आयएसआय) प्रमुख लेफ्टनंट जनरल फैज हमीद यांनी तालिबानचे नेते मुल्ला अब्दुल गनी बरदार यांची भेट घेतल्याचेही तालीबानने मान्य केले आहे. No one will be allowed to interfere in Afghanistan, the Taliban slammed Pakistan

    काबूल येथे सोमवारी पत्रकार परिषदेत बोलताना तालिबानचे प्रवक्ते जबीऊल्लाह मुजाहिद यांनी आयएसआय प्रमुखांनी काबूल दौऱ्यात बरदार यांची भेट घेतल्याचे कबुल केले. काबूलवर तालिबानने कब्जा मिळविल्यानंतर अफगाणिस्तानला भेट देणारे फैज हमीद हे पहिले विदेशी आहेत. अफगाणच्या भूमीचा वापर पाकिस्तानविरुद्ध केला जाणार नाही, असे आश्वासन तालिबानने पाकिस्तानला दिल्याचे मुजाहिद यांनी पत्रकार परिषदेत सांगितले होते.



    त्याचबरोबर अफगाणिस्तानच्या भूमीचा वापर दुसऱ्या देशात दहशतवाद पसरविण्यासाठी होऊ नये. अफगाणिस्तानमधील स्थितीवरून भारत आणि रशिया समानरूपाने चिंतित आहेत, असे रशियाचे भारतातील राजदूत निकोलाय कुदाशेव्ह यांनी म्हटले आहे. कुदाशेव्ह म्हणाले, रशिया आणि काश्मीरमध्ये दहशतवाद वाढण्याचा धोका आहे. भारत आणि रशिया दहशतवाद्यांच्या कोणत्याही धोक्याचा मुकाबला करण्यासाठी काम करीत राहतील. अफगाणमध्ये सुरक्षा, स्थिरतेची खात्री देणारे समावेशी सरकार असावे.

    No one will be allowed to interfere in Afghanistan, the Taliban slammed Pakistan

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    उज्ज्वल निकमांना उमेदवारी; म्हणे, पूनम महाजनांचा पत्ता कट; पण हा तर खरा त्या पलीकडचा “मास्टर स्ट्रोक”!!

    कोल्हापूरची लढाई शाहू महाराज विरुद्ध संजय मंडलिक न ठेवता मोदी विरुद्ध राहुल गांधी करण्यात महायुती यशस्वी!!

    पुरोगामी महाराष्ट्राच्या नुसत्याच तोंडी वाफा; दुसऱ्या टप्प्यात मतदारांनी घरात काढल्या झोपा!!; वाचा मतदानाचा आकडा!!