Sunday, 4 May 2025
  • Download App
    Narayan Rane ! ही तर काँग्रेसला धमकी : शरद पवार जे बोलतात त्याचा उलट अर्थ घ्यायचा असतो ; ते कधीही शिवसेनेला बरोबर घेऊन निवडणूक लढवणार नाहीत Narayan Rane! This is a threat to the Congress:  take the opposite meaning of Sharad Pawar ; He will never contest elections with Shiv Sena

    Narayan Rane ! ही तर काँग्रेसला धमकी : शरद पवार जे बोलतात त्याचा उलट अर्थ घ्यायचा असतो ; ते कधीही शिवसेनेला बरोबर घेऊन निवडणूक लढवणार नाहीत

    • शरद पवार साहेब जेव्हा एखादी गोष्ट सांगतात तेव्हा त्याचा उलट अर्थ लावायचा असतो.

    • पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे  यांची राजधानी दिल्लीत जी भेट झाली त्यावरुन सध्या महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चा सुरु आहेत.

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे  सर्वेसर्वा शरद पवार यांनी कालच शिवसेनेचं  तोंडभरुन कौतुक केलं. मात्र पवार जे बोलतात त्याचा उलट अर्थ घ्यायचा असतो. शरद पवार कधीही शिवसेनेला बरोबर घेऊन निवडणूक लढवणार नाहीत. ही त्यांनी काँग्रेसला दिलेली धमकी आहे.असा दावा नारायण राणे यांनी केला आहे.Narayan Rane! This is a threat to the Congress:  take the opposite meaning of Sharad Pawar ; He will never contest elections with Shiv Sena

    शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या 22 व्या स्थापना दिनाच्या कार्यक्रमात बोलताना शिवसेनेवर प्रचंड कौतुकाचा वर्षाव केला.शिवसेना हा विश्वासार्ह पक्ष आहे असंही यावेळी पवार म्हणाले. दुसरीकडे आज शरद पवार यांनी राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्यासोबत तब्बल तीन तास चर्चा केली. यामुळे शरद पवार यांच्या मनात नेमकं काय आहे? याविषयी पुन्हा एकदा वेगवेगळ्या चर्चा सुरु झाल्या आहेत.

    नारायण राणे नेमकं काय म्हणाले ?

    राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष माननीय शरद पवार साहेब आगामी काळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शिवसेनेबरोबर निवडणूक लढवणार, असे म्हणालेले आहेत.

    जरी शरद पवार साहेब असे म्हणालेले असले तरी शरद पवार साहेब कधीही शिवसेनेबरोबर निवडणूक लढवणार नाहीत. ही त्यांनी काँग्रेसला दिलेली धमकी आहे. माननीय शरद पवार साहेब जेव्हा एखादी गोष्ट सांगतात तेव्हा त्याचा उलट अर्थी अर्थ लावायचा असतो.असं ट्वीट नारायण राणे यांनी केलं आहे.

    पुढील निवडणुकांसाठी राष्ट्रवादीकडून काँग्रेसवर एक प्रकारे दबाव तंत्राचा देखील वापर केला जाऊ शकतो आणि त्याची सुरुवात आतापासूनच करण्यात आली असल्याची आता यानिमित्ताने चर्चा सुरु झाली आहे.

    दरम्यान, आता नारायण राणे यांनी जो मुद्दा उपस्थित केला आहे त्यामुळे काँग्रेस नेमकी भूमिका घेणार हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे.

    Narayan Rane! This is a threat to the Congress:  take the opposite meaning of Sharad Pawar ; He will never contest elections with Shiv Sena

    Related posts

    “नरकातला स्वर्ग” पुस्तकाच्या प्रकाशनाचे निमंत्रण देण्यासाठी संजय राऊत शरद पवारांच्या घरी; स्वतः पवारांनीच दिली माहिती!!

    ‘प्रो रेसलिंग प्रकारात भारताला ‘रेसलिंग एक्स्ट्रीम मॅनियामुळे स्वतःचे व्यासपीठ उपलब्ध’

    Harshvardhan Sapkal बीडच्या बदनामीचे चित्र बदलून सामाजिक सद्भाव वाढीस जावा: हर्षवर्धन सपकाळ यांची अपेक्षा

    Icon News Hub