• Download App
    स्वबळाचा नारा देणाऱ्या नानांची जीभ घसरली; मोदी – शहांना दोन दाढीवाले म्हणाले...!! nana patole targets PM narendra modi and HM amit shah; used derogetory words

    स्वबळाचा नारा देणाऱ्या नानांची जीभ घसरली; मोदी – शहांना दोन दाढीवाले म्हणाले…!!

    प्रतिनिधी

    पुणे – महाराष्ट्रात स्वबळावर निवडणूक लढविण्याचा नारा देऊन काँग्रेस संघटनेत चैतन्य आणण्याचा प्रयत्न करणाऱ्या प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंची जीभ पुण्याच्या कार्यक्रमात घसरली. भाषणाच्या ओघात त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर खालच्या पातळीवरची भाषा वापरून टीका केली. दिल्लीतल्या दोन दाढीवाल्यांचे शटर आपल्याला बंद करायचेय, असे ते म्हणाले.nana patole targets PM narendra modi and HM amit shah; used derogetory words

    ७० वर्षांमध्ये काँग्रेसने मोठ्या कष्टाने देश आणि व्यवस्था उभी केली. मात्र या सरकारने सात वर्षांत एक एक कंपनी, संस्था विकत आहे, असा दावा करून नाना पटोले म्हणाले, की आगामी निवडणुकीत दिल्लीतील दोन्ही दाढीवाल्यांचे शटर बंद करायचे आहे. एवढेच आपल लक्ष्य आहे. नोटबंदीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींशी माझा समोरासमोर वाद झाला. त्यावेळी नोटबंदीचा निर्णय शेतकरी हिताचा नाही, असे मी मोदींना सांगितले होते.

    काँग्रेसच्या स्वबळाच्या नाऱ्याविषयी बोलताना नाना म्हणाले, की आधीचे सरकार ५ वर्ष चालले, पण त्यावेळी देखील ते प्रत्येक ठिकाणी स्वबळावर चालले. तरी ते सरकार चाललेच की. काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी हे सरकार निर्माण करताना एकच भूमिका मांडली होती की, भाजपला थांबविण्यासाठी या सरकारमध्ये सामील झालो आहोत. त्यामुळे आम्ही पर्मनंट आहोत असा उल्लेख त्यावेळी कुठेही केला नव्हता. काल उद्धव ठाकरे जे बोलले, ते शिवसेना प्रमुख म्हणून बोलले आहेत. मुख्यमंत्री म्हणून बोलले नाहीत. त्यांची एक ठाकरे शैली आहे. मी त्या दोघांची भाजपा आणि शिवसेना यांची भाषा निवडणुकीच्या वेळी ऐकली आहे कोणत्या पातळीवर गेली होती. हे तुम्ही पाहा, असे त्यांनी पत्रकारांना उद्देश्यू सांगितले.

    काँग्रेस आज स्वबळाचा नारा देते आहे. त्याचा नेमका इशारा कोणाकडे आहे ते कळले पाहिजे, असे नाना म्हणाले.

    nana patole targets PM narendra modi and HM amit shah; used derogetory  words

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    ceasefire पाकिस्तानने युद्धबंदीचे उल्लंघन केल्याची परराष्ट्र मंत्रालयानेही केली पुष्टी

    कसलं ceasefire??, अवघ्या 4 तासांत पाकिस्तान कडून विश्वासघात, शस्त्रसंधीचे उल्लंघन, जम्मूतल्या गोळीबारात BSF जवान शहीद!!

    पाकिस्तानच्या विनंतीनंतरच भारताने सध्या थांबविले firing; सिंधू जल करार राहणार स्थगितच, त्यात नाही बदल!!