• Download App
    मंत्रीच मराठा-ओबीसींमध्ये भांडण लावताहेत, पवारसाहेब उघड्या डोळ्यांनी पाहणार का? विनायक मेटे यांचा सवाल | The Focus India

    मंत्रीच मराठा-ओबीसींमध्ये भांडण लावताहेत, पवारसाहेब उघड्या डोळ्यांनी पाहणार का? विनायक मेटे यांचा सवाल

    मराठा समाजाविरोधात ओबीसी समाजाला उभे करून दोघांमध्ये भांडण लावण्याचा कार्यक्रम आखला जातोय. मंत्रिमंडळातील लोकांना हेच करायचे आहे का? उद्धव ठाकरे, तुम्हाला हे होऊ द्यायचं आहे का? आणि पवार साहेबांना हेच उघड्या डोळ्यांनी पाहायचे आहे? असा सवाल शिवसंग्राम संघटनेचे संस्थापक अध्यक्ष विनायक मेटे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांना केला आहे. minister who is causing quarrels between Maratha and OBCs

    विशेष प्रतिनिधी

    पुणे : मराठा समाजाविरोधात ओबीसी समाजाला उभे करून दोघांमध्ये भांडण लावण्याचा कार्यक्रम आखला जातोय. मंत्रिमंडळातील लोकांना हेच करायचे आहे का? उद्धव ठाकरे, तुम्हाला हे होऊ द्यायचं आहे का? आणि पवार साहेबांना हेच उघड्या डोळ्यांनी पाहायचे आहे? असा सवाल शिवसंग्राम संघटनेचे संस्थापक अध्यक्ष विनायक मेटे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांना केला आहे. minister who is causing quarrels between Maratha and OBCs

    मेटे म्हणाले की, महाविकास आघाडी सरकारमधील काँग्रेस पक्षाचे नेते आणि मंत्री अशोक चव्हाण यांना मराठा आरक्षणाच्या उपसमिती पदावरून हटविण्याच्या मागणीबाबत राज्यपालांची भेट घेण्यात आली आहे. या सरकारमधील मंत्री विजय वडेट्टीवार यांनीदेखील मंत्रीपदाची जी शपथ घेतली आहे, त्याचा ते भंग करीत आहे. ते जाती-जातींमध्ये भांडण लावण्याचे काम करीत आहे. हे सर्व मुख्यमंत्री आणि सरकार चालविणारे उघड्या डोळ्याने पाहत आहेत. त्यामुळे वडेट्टीवार यांना मंत्रीपदावरून हटविण्यात यावे.

    minister who is causing quarrels between Maratha and OBCs

    सर्वोच्च न्यायालयात २५ जानेवारीपासून अंतिम सुनावणी होत आहे. सरकार काय तयारी करत आहे? कोणती व्यूहरचना आखत आहे? आता जे वकील आहेत, त्यांच्याव्यतिरिक्त इतर कोणते वकील शासन देणार आहे का?, याबाबतची सरकारची भूमिका स्पष्ट करावी आणि समाजाला विश्वासात घेऊन येणाऱ्या २५ तारखेच्या सुनावणीची तयारी करावी. तसेच सुनावणी होईपर्यंत व निकाल लागेपर्यंत पोलीस, वैद्यकीय, ऊर्जा, शैक्षणिक इत्यादि खात्यांतील नोकरभरती थांबविण्यात यावी, अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे करीत असल्याचे मेटे यांनी सांगितले.

    Related posts

    कसलं ceasefire??, अवघ्या 4 तासांत पाकिस्तान कडून विश्वासघात, शस्त्रसंधीचे उल्लंघन, जम्मूतल्या गोळीबारात BSF जवान शहीद!!

    पाकिस्तानच्या विनंतीनंतरच भारताने सध्या थांबविले firing; सिंधू जल करार राहणार स्थगितच, त्यात नाही बदल!!

    अमेरिका + पाकिस्तान यांनीच ceasefire शब्द वापरला; भारताने फक्त firing आणि military action थांबविल्याचे सांगितले; याचा नेमका अर्थ काय??