विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : कृषी क्षेत्रात सुधारणा करण्याची तत्कालीन पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग आणि तत्कालीन कृषिमंत्री शरद पवार यांची इच्छा होती. पण हितसंबंधींच्या दबावाखाली ते झुकले आणि कृषी सुधारणा होऊ शकल्या नाहीत. मात्र ती हिम्मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दाखविली… Manmohan and Pawar succumbed to vested interests
ही माहिती केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र सिंग तोमर यांनी दिली. “काँग्रेस आणि पवार हे आता का विरोध करीत आहेत, हेच समजायला मार्ग नाही. असे सुधारणावादी कायदे करण्यासाठी केल्या दोन दशकातील सर्वच सरकारांनी कमी जास्त प्रयत्न केले. काँग्रेसने तर जाहीरनाम्यामध्ये सुद्धा आश्वासन दिले होते. पवार अनेक मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून बाजार समित्यांमध्ये सुधारणा करण्याची सूचना करत होते.
मग आता विरोध करत आहेत, तो फक्त संकुचित राजकारणामुळे. मनमोहन सिंग व पवार यांनी जी हिंमत दाखविली नाही, ती मोदींनी दाखवली.
Manmohan and Pawar succumbed to vested interests
त्यामुळेच हितसंबंध दुखावलेली मंडळी शेतकऱ्यांच्या आडून तणाव निर्माण करू पाहत आहे.. पण जनता आणि शेतकरी दोन्हीही मोदींच्या पाठीशी ठाम आहेत. म्हणून तर बिहार गोवा राजस्थान आसाम जम्मू कश्मीर येथे भाजपला दणदणीत यश मिळाले आहे..”, असेही तोमर म्हणाले.