पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या आक्रस्ताळ्या स्वभावामुळे त्या देशभर ओळखल्या जातात. तृणमूल कॉंग्रेसच्या सर्वेसर्वो त्याच असल्याचे संपूर्ण देश मानतो. परंतु, प्रत्यक्षात ममतांच्या पक्षात अनेक बडे नेते आहेत ज्यांच्यामुळे त्यांचा विजय आत्तापर्यंत सुकर झाला आहे. सुवेंदू अधिकारी हे असेच नेते असल्याने त्यांच्या राजीनाम्यामुळे ममता बॅनजी यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे.
विशेष प्रतिनिधी
कोलकत्ता : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या आक्रस्ताळ्या स्वभावामुळे त्या देशभर ओळखल्या जातात. तृणमूल कॉंग्रेसच्या सर्वेसर्वो त्याच असल्याचे संपूर्ण देश मानतो. परंतु, प्रत्यक्षात ममतांच्या पक्षात अनेक बडे नेते आहेत ज्यांच्यामुळे त्यांचा विजय आत्तापर्यंत सुकर झाला आहे. सुवेंदू अधिकारी हे असेच नेते असल्याने त्यांच्या राजीनाम्यामुळे ममता बॅनजी यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे.
mamta banerjee suvendu adhikari news
पश्चिम बंगाल राज्याच्या राजकारणात दबदबा असलेले आणि पक्षातील महत्त्वाचे नेते सुवेंदू अधिकारी यांनी कॅबिनेट मंत्रिपदाचा राजीनामा दिला. पश्चिम बंगालमध्ये नव्या वर्षात विधानसभा निवडणुकीचे रणांगण रंगणार आहे. या पार्श्वभूमीवर सुवेंदू अधिकारी यांनी कॅबिनेट मंत्रिपदाचा राजीनामा देऊन ममतांना हादरा दिला आहे. परिवहन, जलसिंचन, जलस्त्रोत व विकास ही महत्त्वाची तीन खाती तसेच हलदिया विकास प्राधिकरणचे अध्यक्षपद त्यांच्याकडे होतं.
________________________________________________________________________________________________________________
- ममतांच्या राजकीय गडाचे आणखी चिरे ढासळले; सुवेंदू अधिकारी समर्थक पाच नेत्यांचे राजीनामे
________________________________________________________________________________________________________________
ममता आत्तापर्यंत तृणमूल कॉंग्रेसच्या कोणत्याही नेत्याला मानत नव्हत्या. मात्र, सुवेंदू यांच्या राजीनाम्याने त्यांच्या पायाखालची वाळू खरोखरच सरकली आहे. सुवेंदू हे तृणमूल काँग्रेसचा ग्रामीण चेहरा मानले जाणारे ज्येष्ठ नेते, माजी केंद्रीय मंत्री व विद्यमान खासदार शिशिर अधिकारी यांचे थोरले पुत्र आहेत. तब्बल १८ विधानसभा मतदारसंघांवर अधिकारी घराण्याचा प्रभाव असल्याने सुवेंदू हे तृणमूलसाठी महत्त्वाचे होते. त्यामुळेच त्यांचं मन वळविण्याचा प्रयत्नही ममता बॅनर्जी यांनी करून पाहिला.
mamta banerjee suvendu adhikari news
ब्रिटिश राजवटीविरोधात लढलेल्या सरकार कुटुंबात जन्मलेले सुवेंदू हे स्वतंत्र बाणा राखणारे नेते म्हणून पश्चिम बंगालच्या राजकारणात परिचित आहेत. सुवेंदू अधिकारी यांना राजकारणाचे बाळकडू घरातूनच मिळाले. १९८९ मध्ये सुवेंदू अधिकारी यांनी छात्र परिषदेच्या माध्यमातून राजकीय कारकिदीर्ला सुरूवात केली. २००६ मध्ये ते कांता दक्षिणमधून विधानसभेवर निवडून गेले. त्यानंतर सलग दोनदा तमलूक मतदारसंघाचे खासदार म्हणून संसदेत प्रतिनिधित्व केले. २०१६ मध्ये नंदिग्राममधून निवडून गेल्यानंतर ते कॅबिनेट मंत्री झाले. ममता बॅनर्जी यांचे पुतणे खासदार अभिषेक बॅनर्जी व रणनीतिकार प्रशांत किशोर यांच्या पक्षातील चलतीने सुवेंदू अस्वस्थ होते, पूर्व मिदनापूर क्षेत्रात मेळावे घेऊन सुवेंदू अधिकारी यांनी स्वतंत्र चूल मांडण्याचे सूतोवाचही केले होते. मात्र, आता आमदारकी आणि पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानं ते भाजपात जाणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.