• Download App
    अजित पवार यांची ताकद असती तर सोबत आणलेले आमदार सांभाळता आले असते, चंद्रकांत पाटील यांची टीका | The Focus India

    अजित पवार यांची ताकद असती तर सोबत आणलेले आमदार सांभाळता आले असते, चंद्रकांत पाटील यांची टीका

    अजित पवार यांची ताकद असती व त्यावेळी सोबत आणलेले आमदार त्यांना सांभाळता आले असते तर देवेंद्र फडणवीस यांचं सरकार टिकलं असतं. ते सरकार ८० तासांचं ठरलं नसते, अशी टीका भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी अजित पवार यांच्यावर केली आहे.

    विशेष प्रतिनिधी

    शिर्डी : अजित पवार यांची ताकद असती व त्यावेळी सोबत आणलेले आमदार त्यांना सांभाळता आले असते तर देवेंद्र फडणवीस यांचं सरकार टिकलं असतं. ते सरकार ८० तासांचं ठरलं नसते, अशी टीका भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी अजित पवार यांच्यावर केली आहे.

    भाजपमधील काही आमदार नाराज असल्याने राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये येणार असल्याचे वक्तव्य अजित पवार यांनी केले होते. यावर बोलताना पाटील म्हणाले की, तुमचे आघाडी सरकार चांगलं चाललंय तर मग आमच्या आमदारांना तुम्ही आकर्षित कशाला करताय?, तुम्ही सरकार चालवा, आम्ही विरोधी पक्ष सांभाळू. ajit pawar chandrakant patil latest news

    शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यावर टीका करताना पाटील म्हणाले की, न्यायालयाने निर्णय द्यायचा नाही, मग काय यांची दादागिरी चालणार का? कोण संजय राऊत? घटनेच्या चौकटीतील गोष्टी मानाव्या लागतील. एखाद्या घटनेसंदर्भात न्यायालयात जायचे नाही का? यांना निवडणूक आयोग आणि कोर्टाचे निर्णय मान्य नाहीत. डॉ. बाबासाहेबांच्या घटनेवर देशाचा कारभार उत्तम सुरू आहे आणि पुढेही सुरू राहील. हे सर्व तुम्हाला मान्य नाही का?

    निवडणुका असू दे निर्णय असू देत शिवसेना स्वत:चे प्रचंड नुकसान करून घेतंय. पण मी असे काही म्हटलं की संजय राऊत यांना सत्तेशिवाय झोप येत नाही, असा अग्रलेख लिहिणार आहेत. आम्हाला उत्तम झोप लागते. आम्हाला काय फरक पडत नाही, मात्र शिवसेना संपत चाललीय. 1+1+1 असे तीनच होणार दोन होणार नाही. त्यामुळे तीन पक्ष एकत्र आल्यावर त्यांची ताकद जास्तच होणार आहे. तीन जण एकत्र आल्यावर मतांचे एकत्रीकरण होणारच आहे. ग्रामपंचायत निवडणुकीतसुद्धा महाविकास आघाडीचा प्रयत्न होईल, मात्र आम्हीसुद्धा ताकदीने निवडणुका लढवणार असल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले.

    ajit pawar chandrakant patil latest news

    मला चंपा बोललं जातं, मात्र आम्ही त्यास उत्तर देत नाही. मुख्यमंत्री यांना उठा आणि शरद पवार यांना शपा अस म्हणणार का? ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. निवडणूक संपल्यावर पाच वर्ष एकत्र काम करावं. मात्र गेल्या वर्षात सरकार वाचवण्यासाठी विरोधकांना टार्गेट केलं जातंय. अशा पद्धतीने राग मनात धरून सरकार चालत नाही, असेही पाटील यांनी सांगितले.

    Related posts

    उज्ज्वल निकमांना उमेदवारी; म्हणे, पूनम महाजनांचा पत्ता कट; पण हा तर खरा त्या पलीकडचा “मास्टर स्ट्रोक”!!

    कोल्हापूरची लढाई शाहू महाराज विरुद्ध संजय मंडलिक न ठेवता मोदी विरुद्ध राहुल गांधी करण्यात महायुती यशस्वी!!

    पुरोगामी महाराष्ट्राच्या नुसत्याच तोंडी वाफा; दुसऱ्या टप्प्यात मतदारांनी घरात काढल्या झोपा!!; वाचा मतदानाचा आकडा!!