• Download App
    ममता आल्या, यूपीएला सुरुंग लावून गेल्या; तरी प्रदेश काँग्रेस नेत्यांनी सुटकेचा नि:श्वास का सोडला?? |Mamata didn't split Maharashtra congress during her Mumbai visit

    ममता आल्या, यूपीएला सुरुंग लावून गेल्या; तरी प्रदेश काँग्रेस नेत्यांनी सुटकेचा नि;श्वास का सोडला??

    पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी महाराष्ट्रात आल्या. दोन दिवस राहिल्या आणि अखेरच्या दिवशी संयुक्त पुरोगामी आघाडी अर्थात यूपीएला सुरुंग लावून निघून गेल्या…!!… तरी देखील महाराष्ट्रातल्या प्रदेश काँग्रेसच्या नेत्यांनी सुटकेचा नि:श्वास का सोडला…?? रहस्य आहे नाही??…Mamata didn’t split Maharashtra congress during her Mumbai visit

    पण या रहस्याचा अभ्यास करायला फार मोठे रॉकेट सायन्स लागत नाही. या रहस्याचा अर्थ सरळ आहे. ममता बॅनर्जी आल्या. त्यांनी यूपीए वगैरे काही अस्तित्वातच नाही, असे सांगून सोनिया गांधींच्या नेतृत्वाला आव्हान दिले. पण त्यांच्या मुंबई दौऱ्याचे वैशिष्ट्य असे की त्या काँग्रेसच्या एकाही नेत्याला न फोडता निघून गेल्या. ममता बॅनर्जी यांच्या विविध राजकीय दौऱ्यांचे आत्तापर्यंतचे वैशिष्ट्य असे राहिले आहे की त्या ज्या कुठल्या राज्यात जातील तिथे भाजपवर प्रचंड तोंडी फैरी झाडतात आणि काँग्रेस नेत्यांना फोडतात.



    पण महाराष्ट्रात मात्र दोन दिवस राहून देखील त्यांनी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचा एकाही नेत्याला तृणमूल काँग्रेसच्या गळाला लावलेले नाही. म्हणजे त्यांनी प्रदेश काँग्रेस अधिकृतरित्या फोडली नाही. त्यामुळे सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाला जरी त्यांनी आव्हान दिले असले तरी महाराष्ट्र काँग्रेस मधला एकही नेता न फुटल्याने प्रदेश काँग्रेसच्या नेत्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.

    अर्थात ममता बॅनर्जी आणि शरद पवार यांनी सिल्वर ओकमधल्या बैठकीनंतर जी छोटेखानी पत्रकार परिषद घेतली तिच्यात दोन्ही नेते संयुक्त पुरोगामी आघाडीच्या अस्तित्वाला सुरुंग लावून मोकळे झाले. काँग्रेस जर भाजपशी दोन हात करायला तयारच नाही, तर आम्ही काय करणार? आम्ही स्वतंत्रपणे भाजपशी लढू, असे ते दोन्ही नेते म्हणाले.

    ममता बॅनर्जी यांच्या या आक्रमक वक्तव्याला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रत्युत्तर मात्र दिले आहे. भाजपशी लढाई करताना अहंकाराने नाही किंवा व्यक्तिगत महत्त्वाकांक्षेने नाही तर एकजुटीने लढावे लागेल, असा टोला नाना पटोले यांनी ममता बॅनर्जी आणि शरद पवार यांची नावे न घेता लगावला.

    पण ममता बॅनर्जी यांच्या दौऱ्याच्या दोन दिवस मात्र प्रदेश काँग्रेसचे नेते अर्थातच अस्वस्थ राहिले. कारण ममता बॅनर्जी यांच्या नावलौकिकाला अनुसरून जर त्यांनी प्रदेश काँग्रेस मधला नेता फोडून काँग्रेसच्या गळाला लावला असतात प्रदेश काँग्रेसचा तोटा झाला असता. तो तोटा सध्यातरी झालेला दिसत नाही आणि त्यामुळेच नाना पटोले यांनी ममता बॅनर्जी यांना प्रत्युत्तर दिले असले तरी त्यांनी आतून सुटकेचा नि:श्वास देखील सोडलेला दिसतो आहे…!!

    Mamata didn’t split Maharashtra congress during her Mumbai visit

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Thackeray brothers : म्हणे, ठाकरे बंधू एकत्र, अफाट ताकदीच्या वल्गनांना फुटले पंख!!

    Rahul Gandhi राहुल गांधींच्या तोंडून नेहरुंचे “री ब्रॅण्डिंग”, गांधीजींच्या सत्यशोधनाच्या जॅकेटचे केले “री फिटिंग”!!