विशेष प्रतिनिधी
कोलकाता : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना नेमके झालेय तरी काय, त्यांचा खोटेपणा संपायलाच तयार नाही. विश्व भारती विद्यापीठाने शताब्दी समारंभाचे निमंत्रणाचे पत्र त्यांना कुलगुरूंच्या स्वाक्षरीने पाठविले. त्यावर दिवसभर वाद रंगला…
विद्यापीठाने संबंधित पत्र मीडियाला दिले. ते मीडियावर आणि सोशल मीडियावर फिरले देखील… तरी देखील ममतांचे खोटेपणाचे टुमणेच संपायला तयार नाही. दुपारी ३.५० वाजता ट्विट करून ममता म्हणतात… त्यांनी मला पदवीप्रदान सोहळ्याला बोलवले नाही. काही लोक तेथे आले होते. पण ते विश्व भारती विद्यापीठ उद्धवस्त करू शकणार नाहीत. कारण ते तात्पुरते आले होते. त्यांचे दिवस आता भरत आले आहेत.
विद्यापीठाच्या शताब्दी समारंभाला ममतांना मुख्यमंत्री या नात्याने निमंत्रण दिले होते. पण आजच्या समारंभाचे प्रमुख पाहुणे पंतप्रधान नरेंद्र मोदी असल्याने ममतांनी येण्याचे टाळले होते. त्यांच्या निमंत्रणाच्या मुद्द्यावरून तृणमूळ काँग्रेसने पत्रकार परिषद घेऊन कांगावा केला…
पण विद्यापीठाने अधिकृत निमंत्रण पत्रच मीडियाला दिले आणि सोशल मीडियावर व्हायरल केले… तरीही ममतांनी दुपारी ३.५० वाजता वर उल्लेख केलेले ट्विट करून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर दुगाण्या झोडल्या आणि आपल्याला विद्यापीठाने निमंत्रण दिले नसल्याचा कांगावा देखील केला.
We all salute Amartya Sen. Just because he isn't inclined towards BJP's ideology, they're making such allegations against him: West Bengal CM on Amartya Sen's name appearing on the list of illegal plot holders in Visva-Bharati pic.twitter.com/8WyiSuMuFs
— ANI (@ANI) December 24, 2020