• Download App
    Mallikarjun Kharge abused Modi as terrorist, election commission issues notice निवडणूक रंगात आल्याबरोबर मोदींना शिव्या; मल्लिकार्जुन खर्गेंनी पुढे चालविली काँग्रेसी पराभवाची परंपरा!!

    निवडणूक रंगात आल्याबरोबर मोदींना शिव्या; मल्लिकार्जुन खर्गेंनी पुढे चालविली काँग्रेसी पराभवाची परंपरा!!

    Mallikarjun Kharge

    नाशिक : निवडणूक रिंगणात आल्याबरोबर मोदींना शिव्या; मल्लिकार्जुन खर्गे यांनी पुढे चालवली काँग्रेसी पराभवाची परंपरा!!, ही महत्त्वाची घडामोड पश्चिम बंगाल आणि तामिळनाडू विधानसभांच्या निवडणुकीत घडली.Mallikarjun Kharge abused Modi as terrorist, election commission issues notice

    – सोनिया गांधींनी सुरू केली शिव्यांची “परंपरा”

    कुठलीही निवडणूक ऐन रंगात आली, की काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना शिव्या दिल्या नाहीत, असे आत्तापर्यंत कधीही घडलेले नाही. कुठलीही निवडणूक असू देत, मोदींना चवताळून शिव्या दिल्याशिवाय काँग्रेसच्या नेत्यांना स्वस्थ बसवतच नाही. काँग्रेसची मोदींना शिव्या देण्याची परंपरा 2007 मध्ये सोनिया गांधींनी स्वतः सुरू केली. त्यांनी गुजरात विधानसभेच्या निवडणुकीत प्रचार करताना मोदींना मौत का सौदागर म्हटले होते. मोदींनी त्या प्रकाराचा चपखल वापर करून गुजरात विधानसभेची निवडणूक जिंकली होती.



    पण त्यानंतर मोदींना शिव्या घालण्याची परंपरा काँग्रेसच्या बाकीच्या नेत्यांनी कायम ठेवली. मणिशंकर अय्यर यांनी मोदींना चहावाला म्हणून हिणवले. त्यांना नीच म्हटले. जयराम रमेश, पवन खेडा या काँग्रेसच्या प्रवक्त्यांनी सुद्धा मोदींना शिव्या दिल्या. राहुल गांधी मोदींना चोर म्हणाले.

    – मोदींनी उलटविल्या काँग्रेसवर शिव्या

    पण नरेंद्र मोदी यांनी या सगळ्या शिव्यांचा राजकीय वापर करून घेऊन निवडणुका जिंकल्या, तरी काँग्रेसचे नेते सुधारले नाहीत. त्यांनी मोदींना शिव्या देणे कमी केले नाही. काँग्रेसने तुफान पैसे देऊन नेमलेला सल्लागार प्रशांत किशोर याने काँग्रेसच्या नेत्यांना भरपूर पाठ पढविला. तुम्ही मोदींना शिव्या देऊ नका. मोदी त्या शिव्यांचा वापर तुमच्याच विरोधात करतात त्यात ते यशस्वी होतात. सबब तुम्ही शिव्या घातल्या नाहीत, तर मोदींना तुमच्या विरोधात तुमच्या शिव्यांचे हत्यार वापरता येणार नाही, असे प्रशांत किशोरने काँग्रेसच्या नेत्यांच्या मनावर ठसवायचा प्रयत्न केला पण त्यात तो अयशस्वी ठरला.

    – मल्लिकार्जुन खर्गे यांची जीभ घसरली

    पण या सगळ्यांवर काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी कडी केली‌. त्यांनी नरेंद्र मोदींना थेट दहशतवादी म्हटले त्यामुळे देशभर संताप उसळला. मल्लिकार्जुन खर्गे हे काही काँग्रेसचे प्रवक्ते किंवा ज्युनिअर नेते नाहीत. ते ८५ वर्षांचे ज्येष्ठ नेते आणि काँग्रेसचे अध्यक्ष आहेत, तरीसुद्धा त्यांना मोदींना शिव्या घालायचा मोह आवरता आला नाही. त्यामुळे त्याचा परिणाम व्हायचा तोच झाला. भाजपने मोदींना शिव्या घातल्याचा मुद्दा उचलून धरला. भाजपच्या सगळ्या मुख्यमंत्र्यांनी खर्गे आणि काँग्रेसला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले. खुद्द केंद्रीय निवडणूक आयोगाने सुद्धा मल्लिकार्जुन खर्गे यांच्या वक्तव्याची दखल घेऊन त्यांना प्रतिबंधात्मक नोटीस पाठविली. त्यामुळे खर्गे कायदेशीर दृष्ट्या सुद्धा अडचणीत आले. खर्गे यांनी मोदींना दहशतवादी म्हटल्यानंतर स्वतःहून बरीच सारवासारव केले पण त्यांच्या तोंडून निघालेले वाक्य स्पष्ट असल्यामुळे त्यांना कायदेशीर पळवाट काढता आली नाही.

    – निवडणुकीतला परिणाम स्पष्ट

    काँग्रेसच्या नेत्यांनी मोदींना आतापर्यंत जेव्हा जेव्हा शिव्या घातल्या, त्याचा परिणाम त्यांनाच भोगावा लागला. प्रत्येक निवडणुकीत मोदींच्या समोर त्यांना पराभव पत्करावा लागला. पश्चिम बंगाल आणि तामिळनाडू या दोन्ही विधानसभांच्या निवडणुकीमध्ये यापेक्षा वेगळा परिणाम होण्याची शक्यता नाही.

    Mallikarjun Kharge abused Modi as terrorist, election commission issues notice

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Mohan Bhagwat : भागवत म्हणाले- विज्ञान आणि धर्म या दोन्हीतून शांती मिळाली नाही; राजापासून विज्ञानापर्यंत सर्व मॉडेल्स अयशस्वी

    ममता बॅनर्जींनी कितीही जोर लावू द्या, आम्ही बंगालमध्ये बाबरी मशीद बांधू देणार नाही; अमित शाहांचा इशारा

    Pappu Yadav : पप्पू यादव म्हणाले- 99% बाबा मुलींचे शोषण करतात, राजकारणात शोषणाशिवाय महिलांना प्रवेश नाही