• Download App
    MAHESH MANJREKAR CONTROVERSY: सेन्सॉर बोर्डाचे अध्यक्ष-दिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्यावर गुन्हा नोंदवण्याचा विशेष पॉक्सो न्यायालयाचा आदेश  MAHESH MANJREKAR CONTROVERSY: Special POSCO court orders to register case against censor board chairman-director Mahesh Manjrekar

    MAHESH MANJREKAR CONTROVERSY: सेन्सॉर बोर्डाचे अध्यक्ष-दिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्यावर गुन्हा नोंदवण्याचा विशेष पॉक्सो न्यायालयाचा आदेश 

    नाय वरन भात लोन्चा, कोन नाय कोन्चा’ या चित्रपटातील आक्षेपार्ह चित्रीकरणामुळे दिग्दर्शक व निर्माते महेश मांजरेकर यांच्या अडचणी वाढल्या आहेत


    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : मुंबई – सेन्सॉर बोर्डाचे अध्यक्ष, तसेच ‘नाय वरन भात लोन्चा, कोन नाय कोन्चा’ या चित्रपटाचे दिग्दर्शक महेश मांजरेकर यांसह चित्रपट निर्माते नरेंद्र हिरावत अन् श्रेयस हिरावत, सहनिर्माते विजय शिंदे, तसेच चित्रपट निर्मात्या आस्थापनांशी संबंधित व्यक्ती यांवर गुन्हा नोंदवण्याचा आदेश विशेष पॉक्सो न्यायालयाने दिला आहे.MAHESH MANJREKAR CONTROVERSY: Special POSCO court orders to register case against censor board chairman-director Mahesh Manjrekar

    या चित्रपटात महिला आणि लहान मुले यांच्यातील संबंधांचे आक्षेपार्ह अन् बीभत्स चित्रण दाखवल्याच्या प्रकरणी न्यायालयात याचिका प्रविष्ट करण्यात आली आहे.

    या याचिकेवर नुकतीच विशेष न्यायाधीश एन्.एस्. शेख यांच्या खंडपिठासमोर सुनावणी झाली. या प्रकरणी चित्रपट परीनिरीक्षण मंडळाच्या (‘सेन्सॉर बोर्डा’चे) अध्यक्षांवरही गुन्हा नोंदवण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे.

    सामाजिक कार्यकर्त्या सीमा देशपांडे यांनी त्यांचे वकील ऍड. प्रकाश सालसिंगकर यांच्यामार्फत याप्रकरणी न्यायालयात तक्रार करून कारवाईची मागणी केली होती. चित्रपट प्रदर्शित करण्यापूर्वी मांजरेकर यांनी एक ट्रेलर रिलिज केला होता. त्यात ही आक्षेपार्ह दृष्ये होती. या तक्रारीवरून विशेष न्यायमुर्ती एस. एन. शेख यांनी माहिम पोलिसांना याप्रकरणी चौकशीचे आदेश दिले.

     

    MAHESH MANJREKAR CONTROVERSY: Special POSCO court orders to register case against censor board chairman-director Mahesh Manjrekar

     

    Related posts

    उज्ज्वल निकमांना उमेदवारी; म्हणे, पूनम महाजनांचा पत्ता कट; पण हा तर खरा त्या पलीकडचा “मास्टर स्ट्रोक”!!

    कोल्हापूरची लढाई शाहू महाराज विरुद्ध संजय मंडलिक न ठेवता मोदी विरुद्ध राहुल गांधी करण्यात महायुती यशस्वी!!

    लोकसभेत धडाडणार भाजपकडून कायद्याची तोफ; उत्तर मध्य मुंबईतून उज्ज्वल निकमांना उमेदवारी!!